yuva MAharashtra आत्ताची सर्वात मोठी बातमी : मनोज जरांगेंचा अखेर विजय , सरकारने केल्या सर्व अटी मान्य...

आत्ताची सर्वात मोठी बातमी : मनोज जरांगेंचा अखेर विजय , सरकारने केल्या सर्व अटी मान्य...


====================================
==================================== 
    
           आत्ताची सर्वात मोठी बातमी 

मराठा वादळ मनोज जरांगे-पाटील आणि त्यांचा मराठा समाज जिंकलेला आहे. मनोज जरांगे-पाटील यांनी मराठा आरक्षणाची लढाई अखेर जिंकली आहे.
 आज पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास मनोज जरांगे पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन सरकारने सर्व मागण्या मान्य केल्या आहेत असे सांगितले. यावेळी शिंदे सरकारचे कॅबिनेट मंत्री दिपक केसरकर यांच्या सह आदी मंत्री महोदय उपस्थित होते.


   सरकारने जरांगे-पाटील यांना हवा तसा (सगेसोयरे बाबत) जीआर देखील काढले आहेत. सकाळी सात वाजता स्वता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मनोज जरांगे-पाटील यांना भेटायला जाणार आहेत. यावेळी या सर्व बाबींची अधिकृत घोषणा केली जाण्याची शक्यता वर्तवली जात असून यापुढे काय घटना घडतील सकाळी सात नंतरच समजणार आहेत. परंतु या क्षणाची ताजी बातमी अशी आहे की , मनोज जरांगे-पाटील जिंकलेले आहेत. अखेर मराठा समाजाच्या आरक्षणाचा तिढा सुटलेला आहे , सरकारने मनोज जरांगे-पाटील यांच्या मागणी प्रमाणे सरकारी अद्यादेश काढलेले आहेत.

हेही पहा ----



◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆