=====================================
=====================================
कुंडल : वार्ताहर २७ जानेवारी २०२४
देशसेवा ही फक्त कुठल्यातरी बॉर्डरवर जाऊनच केली पाहिजे असे नाही तर, ज्याला जे काम नेमून दिले आहे ते प्रामाणिकपणे करणे ही सुद्धा एकप्रकारची देश सेवाच आहे आणि याची सुरुवात स्वतःपासून करा. असे प्रतिपादन क्रांतीचे अध्यक्ष शरद लाड यांनी केले.
क्रांतिअग्रणी डॉ. जी. डी. बापू लाड सहकारी साखर कारखान्यावर ७५ व्या प्रजासत्ताक दिन साजरा झाला. यावेळी भाई संपतराव पवार यांच्या हस्ते ध्वजवंदन करणेत आले.
यावेळी संपतराव पवार म्हणाले, ज्यासाठी देश स्वतंत्र केला त्याचा उद्देश आज सफल होताना दिसत नाही. जे स्वातंत्र्य मिळाले त्याला अनेकांनी बलिदान दिले आहे. क्रांतिअग्रणी डॉ.जी.डी.बापू लाड यांनी स्वातंत्र्यानंतरचे हे चित्र बदलावे म्हणून सहकाराची मुहूर्तमेढ रोवली यातून बापूंच्या स्वप्नाला दिशा दिली जातेय ही एक जमेची बाजू आहे. यासाठी आमदार अरुणअण्णा लाड बापूंचे विचार खंबीरपणे चालवीत आहेत यातून नवनविन संकल्पना राबविल्या जातायत हीच बापूंना श्रद्धांजली असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी उपाध्यक्ष दिगंबर पाटील, संचालक अंजना सूर्यवंशी, जयप्रकाश साळुंखे, संग्राम जाधव, बाळकृष्ण दिवाण, वैभव पवार, दिलीप थोरबोले, अरविंद कदम, कुंडलिक एडके, अंकुश यादव, संपतराव सावंत, कार्यकारी संचालक सी.एस.गव्हाणे, कारखाना कर्मचारी उपस्थित होते.
क्रांतिअग्रणी डॉ.जी.डी. बापू सहकारी साखर कारखान्यावर ७५ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वज फडकवताना भाई संपतराव पवार.
हेही पहा ----
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆