yuva MAharashtra केंद्र सरकारने वाहनचालकांसाठी केलेला नवीन कायदा तात्काळ मागे घ्या ; स्वाभिमान मालट्रक वाहतूकदार असोसिएशन कोल्हापूर या संघटनेची मागणी ; ...जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस प्रमुख व परिवहन अधिकारी यांना दिले निवेदन

केंद्र सरकारने वाहनचालकांसाठी केलेला नवीन कायदा तात्काळ मागे घ्या ; स्वाभिमान मालट्रक वाहतूकदार असोसिएशन कोल्हापूर या संघटनेची मागणी ; ...जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस प्रमुख व परिवहन अधिकारी यांना दिले निवेदन


=====================================
=====================================

कोल्हापूर (ता.१) : डिसेंबर 2023 मध्ये झालेल्या हिवाळी अधिवेशना मध्ये केंद्रीय गृहमंत्री मा. अमित शहा यांनी एक नवीन कायदा (हिट अँड रन कायदा) अमलात आणला आहे. हा कायदा अतिकठोर आणि अन्यायकारक आहे. अपघात झाल्यास ड्रायव्हर दोषी अढळल्यास ड्रायव्हर पळून गेल्यास ड्रायव्हर वर 7 लाख दंड किंवा 10 वर्ष तुरुंगवास असा कायदा पारित केलेला आहे.
हया कायद्याला स्वाभिमान मालट्रक वाहतूकदार असोसिएशन सह अनेक संघटनांचा विरोध आहे.

केंद्र सरकारने हा कायदा तात्काळ मागे घेण्यासंदर्भात सोमवार दिनांक 1/1/2024 रोजी विविध संघटनांच्या वतीने मा. राहुल रेखावार जिल्हाधिकारी, महेंद्र पंडित जिल्हा पोलीस प्रमुख, रोहित काटकर  परिवहन अधिकारी यांना स्वाभिमान माल ट्रक वाहतूकदार असोसिएशन तर्फे निवेदन देण्यात आले.

 यावेळी अध्यक्ष युवराज माने , सचिव युवराज पाटील , संचालक राजू हाताळी , सचिन पाटील , महादेव माने व सभासद उपस्थित होते.
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆