=====================================
=====================================
कुंडल : वार्ताहर दि. २१ जानेवारी २०२४
आमदार अरुणअण्णा लाड यांच्या विशेष प्रयत्नातून कुंडल येथे पेव्हिंग ब्लॉक बसवणे, अंतर्गत गटारी, काँक्रीट अशा विविध सोईसुविधा पुरवणेच्या रु 15 लाखांच्या कामांचे उदघाटन करण्यात आले.
येथील दत्त मंदिरासमोरील धनाजी माळी घर ते दत्तात्रय चव्हाण घरापर्यंतचा रस्ता खराब असल्याने तेथील नागरिकांची आमदार अरुण लाड यांच्याकडे सतत मागणी होती. त्यांच्या मागणी नुसार नागरी व जन सुविधा योजनेतून या रस्त्याच्या कामाचा आज शुभारंभ झाल्याने येथील नागरिकांनी आमदार अरुण लाड यांचे विशेष आभार मानले.
यावेळी आमदार लाड म्हणाले, गावातील कोणताही रस्ता कच्चा राहिला नाही, गटारींची कामे ही पूर्ण झाली आहेत तरीही अजून काही असतील तर सांगा ती कोणत्याही योजनेतून पूर्ण करू. नवीन ग्रामपंचायत सदस्यांनी आपापल्या वार्डातील नागरिकांच्या समस्या ऐकून त्या सोडवण्यासाठी प्रयत्न करा लागेल तेथे क्रांती कुटुंब नागरिकांच्या मदतीसाठी तत्पर असेल अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.
यावेळी सरपंच जयराज होवाळ, उपसरपंच अर्जुन कुंभार, सदस्य प्रशांत आवटे, किरण लाड, राहुल पवार, शंकर पवार, राहुल लाड,
मनिषा लाड, रेश्मा टेके, सुगंधा एडके, शुभांगी माळी, अशोक विभुते, लक्ष्मण हेंद्रे, पंजाब पवार, भीमराव माने, अनिल माळी, जगदीश माळी, शामराव शिंदे, यांचेसह दत्त मंदिर परिसरातील नागरिक उपस्थित होते.
आमदार अरुण लाड यांनी हे काम करणाऱ्या कंत्राटदाराला बोलावून दर्जेदार काम झाले पाहिजे असे आदेश दिले तर नागरिकांनीही या कामाकडे लक्ष देऊन काम पूर्ण करून घ्यावे असे आवाहन केले.
नागरी सुविधा जनसुविधा योजनेतून पेव्हिंग ब्लॉक बसवणे, गटारी बांधकाम व सोयीसुविधा पुरवण्याच्या कामाचे उदघाटन करताना आमदार अरुणअण्णा लाड. यावेळी सरपंच जयराज होवाळ, उपसरपंच अर्जुन कुंभार,आदी उपस्थित होते.
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆