रेल्वे स्थानकावरील अपुऱ्या सुविधा तात्काळ पूर्ण करण्यात याव्यात व एक्सप्रेस गाड्यांना थांबा मिळावा...ग्रामस्थांनी दिले निवेदन
=====================================
=====================================
भिलवडी : वार्ताहर २५ जानेवारी २०२४
पलूस तालुक्यातील भिलवडी रेल्वे स्टेशन येथे रेल्वे आज गुरुवार दि. २५ जानेवारी रोजी मध्य रेल्वेचे महाप्रबंधक श्री राम करण यादव यांनी भेट दिली.
यावेळी चितळे उद्योग समूहाचे उद्योगपती मा.श्रीपाद चितळे, निखिल चितळे , ग्रामपंचायत उपसरपंच राजेश जाधव ग्रामपंचायत सदस्य प्रविण शिरतोडे यांच्या सह आदी ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते.
भिलवडी रेल्वे स्टेशन मधील सोई सुविधा प्रवासी यांची होणारी गैरसोय,पादचारी उड्डाणपूल दिव्यांग बांधवांसाठी सरकता जिना(लिफ्ट)सोय,नविन झालेला प्लॅटफॉर्म मध्ये बैठक व्यवस्था,उन्हात पावसात प्रवासी यांना होणारी गैरसोय टाळण्यासाठी शेड उभारणी तातडीने करणेत यावी व जलद एक्सप्रेस असनाऱ्या रेल्वे गाड्यांना भिलवडी स्टेशन येथे थांबा मिळावा यासाठी जेष्ठ नेते नंदकुमार कदम यांचे मार्गदरशनाखाली ग्रामपंचायत उपसरपंच राजेश जाधव , सद्श्य प्रविण शिरतोडे यांनी ग्रामस्थांच्यावतीने यावेळी रेल्वेचे महाप्रबंधक श्री राम करण यादव यांना निवेदन दिले व तातडीने मागण्या मान्य करून रेल्वे प्रवाशांना दिलासा द्यावा अशी विनंती करण्यात आली.
हेही पहा ----
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆