=====================================
=====================================
डोळा आपल्या शरीरातील अत्यंत महत्त्वाचा आणि नाजूक अवयव आहे. डोळ्यांची काळजी घेणे अत्यंत गरजेचे आहे. अनेकदा तासन्तास मोबाईल, संगणक यावर काम करत असताना आपल्या डोळ्यांवर सुद्धा अनेकदा समस्या निर्माण होतात. अशा वेळी डोळ्यांची योग्य पद्धतीने काळजी घेणे गरजेचे आहे. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला असे काही उपाय सांगणार आहोत आणि या उपायांच्या माध्यमातून तुमच्या डोळ्यांच्या समस्या पूर्णपणे दूर होणारच आहे. पण त्याचबरोबर तुमचे डोळ्यांचे आरोग्य सुद्धा चांगले राहणार आहे. चला तर मग जाणून घेऊया त्याबद्दल..
अनेकदा डोळे लाल होणे, डोळ्यातून पाणी येणे, डोळे दुखणे, डोळे जड होणे, डोळ्यांना कमी दिसू लागणे, अचानक नजर पटलावर अंधारी येऊ लागणे, चष्म्याचा नंबर अचानक वाढत जाणे, डोळ्यांमध्ये गाठी निर्माण होणे,डोळ्यांमध्ये जळजळ होणे यासारख्या अनेक समस्या आपल्याला उद्भवत असतात.
या सर्व समस्या दूर करण्यासाठी आपण घरगुती उपाय करणार आहोत आणि ह्या उपायांमध्ये जी वस्तू लागणार आहे ती वस्तू अत्यंत सोपी असून सहज बाजारामध्ये उपलब्ध होऊन जाते आणि त्याचबरोबर याच वस्तूंचा वापर करून आजचा हा उपाय आपण आपल्या घरामध्ये अगदी सोप्या पद्धतीने करू शकतो.
हा उपाय करण्यासाठी आपल्याला लागणार आहे ते म्हणजे तुरटी. तुरटी आपल्याला किराणा मालाच्या दुकानांमध्ये अगदी सहजरीत्या पाच ते दहा रुपयाला मिळून जाते. यामध्ये असणारे गुणधर्म हे आपल्या डोळ्यांवर असणारा चष्मा कमी करण्यासाठी आणि त्याचबरोबर डोळ्यावर पडलेला ताण कमी करण्यासाठी खूप मदत करतात.
म्हणूनच आपल्याला या उपायासाठी जो सर्वात पहिला घटक लागणार आहे तो म्हणजे तुरटी. आपल्याला एक छोटासा तुकडा तुरटीचा या उपायसाठी लागणार आहे आणि त्यानंतर दुसरा जो पदार्थ आपल्याला या उपायासाठी लागणार आहे त्या पदार्थाचे नाव आहे गुलाब जल.
गुलाब जल चे आयुर्वेदिक शास्त्रामध्ये अत्यंत महत्त्वाचे औषधी गुणधर्म सांगितले आहेत. त्याचबरोबर गुलाब जल हे गुलाबाच्या पाकळ्या एका विशिष्ट तापमानावर पाण्यामध्ये उकळून त्याच्यावर प्रक्रिया करून तयार केले जात असते आणि म्हणूनच त्याला गुलाब जल असे म्हणतात.
गुलाब जल हे डोळ्यांची जळजळ दूर करण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. त्याचबरोबर गुलाबजल अँटी इन्फला मेंटरी गुणधर्माने उपयुक्त असल्याने त्याचा उपयोग आपल्या डोळ्यांसाठी नेहमी लाभदायक ठरतो.
आपल्या डोळ्याच्या पटलाला आराम मिळण्यासाठी गुलाब जलचा वापर केला जातो. बहुतेक वेळा अनेकांना डोळ्यांची एलर्जी सुद्धा होत असते आणि डोळ्यांचे आजार असणे हा एक आजार सुद्धा आहे त्याला वैद्यकीय भाषेमध्ये वेगवेगळे नाव सुद्धा आहे व या प्रकारच्या आजारांमध्ये प्रामुख्याने डोळे जळजळत असतात, त्यात जळजळ होत असते. डोळे सुजतात. डोळ्यांमध्ये व्हायरस तयार होत असतो आणि या सगळ्या समस्या विटामिन 'ए' च्या कमतरतेमुळे सुद्धा होत असतात. म्हणूनच या सर्व समस्या दूर करण्यासाठी आपण या उपायांमध्ये गुलाब जल वापरणार आहोत.
हा उपाय करण्यासाठी आपल्याला सर्वात आधी एक छोटा तुकडा तुरटीचा घ्यायचा आहे आणि त्यानंतर हा छोटासा तुकडा आपल्याला गॅसवर गरम करून घ्यायचा आहे. चिमट्याच्या साहाय्याने तुम्ही हा छोटासा तुकडा गॅसवर गरम करायचा आहे.
गरम केल्यानंतर तुम्हाला एका वाटीमध्ये साधारणत: एक ते दोन चमचा गुलाब जल घ्यायचं आहे आणि त्यामध्ये हा तुकडा टाकायचा आहे. त्यानंतर हे दोन्ही पदार्थ व्यवस्थितपणे आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहेत आणि यापासून जे मिश्रण तयार होईल त्याचा वापर हा उपाय करण्यासाठी आपल्याला करायचा आहे.
दररोज याचे दोन थेंब रात्री झोपताना डोळ्या मध्ये टाकायचे आहे आणि डोळ्यांमध्ये टाकल्यानंतर तसेच आपल्याला चार ते पाच तास डोळे बंद ठेवायचे आहे. हा उपाय आपण दिवसभरात सुद्धा करू शकतो. परंतु रात्री उपाय केल्याने त्याचा आपल्याला फरक जास्त पडत असतो.
कारण उपाय केल्यानंतर आपल्याला किमान दोन ते तीन तास डोळे बंद ठेवायचे आहेत आणि म्हणूनच तुम्ही जर रात्री झोपण्यापूर्वी हे डोळ्यांमध्ये दोन-दोन थेंब टाकले आणि त्यानंतर लगेच डोळे बंद करून झोपी गेला तर यामुळे या उपायाचा फायदा तुम्हाला लगेच दिसून येईल. तर अशा पद्धतीने हा एक छोटासा उपाय तुमच्या घरामध्ये तुम्ही नक्की करून पहा.
संकलन-
निसर्ग उपचार तज्ञ
डॉ. प्रमोद ढेरे, पिंपरी-चिंचवड, पुणे.
आरोग्यविषयक व्याख्याते व लेखक
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆