=====================================
=====================================
पलूस (ता.७) : पुणे पदवीधर आमदार अरुण (अण्णा) लाड यांचे मार्गदर्शनाने शरद फाउंडेशन संचालित शरद आत्मनिर्भर अभियान पलूस कडेगाव व श्री टेके आय क्लिनिक सांगली यांच्या संयुक्त विद्यमाने पुनदी गावातील वृद्ध नागरिकांचे मोफत नेत्र तपासणी करून मोतीबिंदू ची शस्त्रक्रिया करणेत आली..
शरद फाउंडेशन चे संस्थापक क्रांती अग्रणी डॉ. जी. डी. बापू लाड सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष शरद (भाऊ) लाड यांनी या शिबिराचे उदघाटन केले व सर्व रुग्णांची भेट घेऊन विचारपूस केली. भविष्यात पलूस - कडेगाव मतदार संघातील नागरिकांच्या आरोग्यावर शरद फाउंडेशन कुंडल संचिलित शरद आत्मनिर्भर अभियान पलूस कडेगाव मतदार संघात या फाउंडेशनद्वारे सक्षमपणे नागरिकांच्या आरोग्य हिताच्या दृष्टीने काम करु अशी ग्वाही दिली...
क्रांती महिला प्रतिष्टान पलूस - कडेगाव तथा शरद फाउंडेशन च्या अध्यक्षा, सौ. धनश्री लाड (वहिनी) यांच्या संकल्पनेतून शरद आत्मनिर्भर अभियान पलूस - कडेगाव गेली एक वर्ष सातत्याने पलूस कडेगाव मतदार संघातील जनतेसाठी अनेक उपक्रम राबवित असून यासाठी पलूस कडेगाव मधील सर्व गावामध्ये शरद आत्मनिर्भर अभियानाची टीम सक्षमपणे कार्यरत आहे.
तसेच यापुढेही पलूस - कडेगाव मतदार संघातील नागरिकांच्या आरोग्यावर सेवा करू अशी माहिती सौ. धनश्री लाड (वहिनी) यांनी यावेळी दिली.
यावेळी रामचंद्र पाटील (आण्णा), सरपंच पूनम पाटील, दीपक पाटील, अभिजीत मोहिते, कार्याध्यक्ष पलूस तालुका राष्ट्रवादी पार्टी विनायक महाडीक, उपाध्यक्ष शरद फाउंडेशन कुंडल दीपक मदने, संभाजी पाटील, शंकर ढोकळे गुरुजी, हौसेराव पाटील, हौसेराव जाधव, नागेश गुरव, सतीश जाधव, प्रशांत पाटील, मोहित यशवंत, अनिल मोहिते, विकी नार्वेकर, प्रमोद जाधव, तानाजी जाधव, रजनीकांत इंगळे, संजय रणखांबे, विलास शेळके, चेतन पाटील, संदीप पाटील उपस्थित होते.
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆