yuva MAharashtra क्रांतीने घडवली तांत्रिक आणि कृषी क्रांती: एकाच वेळी दोन सर्वोकृष्ट पुरस्काराने सन्मानित

क्रांतीने घडवली तांत्रिक आणि कृषी क्रांती: एकाच वेळी दोन सर्वोकृष्ट पुरस्काराने सन्मानित

खासदार शरद पवार यांनी केले क्रांतीचे कौतुक : शरद लाड

=====================================
=====================================

कुंडल : वार्ताहर               दि. ११ जानेवारी २०२४

क्रांतिअग्रणी डॉ जी डी बापू लाड सहकारी साखर कारखान्याला वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट पुणेचा दक्षिण विभागातील सर्वोकृष्ट तांत्रिक कार्यक्षमतेचा आणि ऊस विकास संवर्धनाचा प्रथम पुरस्कार खासदार शरद पवार यांच्या हस्ते वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट पुणे येथे प्रदान करणेत आला. यावेळी पवार यांनी क्रांती कारखान्याच्या एकूणच कामाचे कौतुक करत शरद लाड यांच्या नेतृत्वाला शुभेच्छा दिल्या.

हा पुरस्कार आमदार जयंतराव पाटील, आमदार दिलीप वळसे-पाटील, साखर संघाचे अध्यक्ष पी.आर.पाटील, राष्ट्रीय साखर संघाचे अध्यक्ष जयप्रकाश दांडेगावकर, हर्षवर्धन पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत आमदार अरुणअण्णा लाड, कारखान्याचे अध्यक्ष शरद लाड, कार्यकारी संचालक चंद्रकांत गव्हाणे आणि संचालक मंडळाने स्वीकारला.

क्रांती कारखान्याने तांत्रिक आणि ऊस क्षेत्र वाढीसाठी पुरस्कार सालात दर्जेदार काम करून साखर उद्योगात उच्च स्थान निर्माण करून, कारखान्याने केलेले कार्यक्षमरित्त्या तांत्रिक कार्य, काटेकोर आर्थिक नियोजन आणि ऊस विकासात केलेल्या भरीव कामामुळे देणेत आला.

कारखान्याने मागील गळीत हंगामात साखरेची गुणवत्ता चांगली ठेवत पाणी, वाफ आणि वीज यांची बचत करून प्रदूषण नियंत्रित केले, कारखान्याने उत्पादन खर्च मर्यादित ठेवून साखर निर्मिती केली. उसाचा तंतुमय निर्देशांक, रिड्यूस्ड मिल एक्स्ट्रक्शन, वाफेचा वापर यांचा ताळमेळ राखून कार्यक्षमतेत भरीव वाढ केली.

तसेच कार्यक्षेत्रामध्ये पीक फेरपालट व सेंद्रिय कर्ब वाढीसाठी काटेकोर नियोजन, कार्यक्षेत्रात सूक्ष्म सिंचनासाठी प्रोत्साहन, ऊस लागवड आणि तोडणीसाठीचे मोबाईल ऍपद्वारे
काटेकोर नियोजन, हिरवळीची खते, कंपोष्ट, रासायनिक खतांचा कार्यक्षम वापर, मोफत माती-पाणी परीक्षण, शेतकरी-कर्मचारी प्रशिक्षण दौरे या वैशीठ्यांमुळे हा पुरस्कार प्रदान करणेत आला.

या पुरस्काराबरोबरच वैयक्तिक विभागातून उक्तृष्ठ चीफ केमिस्ट म्हणून कारखान्याचे चीफ केमिस्ट किरण पाटील यांना उक्तृष्ठ चीज केमिस्ट पुरस्कार प्रदान करण्यात आला.

क्रांती कारखाना क्रांतिअग्रणी डॉ. जी. डी. बापूंच्या विचाराने चालू आहे, कमी उत्पादन खर्चात जास्त उत्पन्न घेणेसाठी उचललेले पाऊल, तसेच नवनवीन तंत्रज्ञान शेतकऱ्याच्या बांधावर पोहोचवून त्याचे राहणीमान उंचावण्यासाठी एकत्रित प्रयत्न केले जात आहेत. इन्सिरेशन बॉयलर, सांडपाण्याचा कार्यक्षम वापर, ड्रोनद्वारे औषध फवारणी, जगातील कोणतेही तंत्रज्ञान शेतकऱ्यांच्या बांधावर सत्वर पोहोचवणे अशा अनेक वैशिठ्यांमुळे कारखान्याला राष्ट्रीय आणि राज्य पातळीवरील आजवर अनेक पुरस्कार मिळाले आहेत.

यावेळी कारखान्याचे संचालक सुकुमार पाटील, जितेंद्र पाटील, अनिल पवार, संग्राम जाधव, अश्विनी पाटील, अशोक विभूते, जयप्रकाश साळुंखे, अंजना सूर्यवंशी, बाळकृष्ण दिवाण, दिलीप थोरबोले, वैभव पवार श्रीकांत लाड, कुंडलिक एडके, सुनील पवार, संदीप पवार, तात्यासाहेब वडेर, संजय पवार यांचेसह कारखान्याचे सर्व संचालक, कार्यकर्ते उपस्थित होते.



क्रांती कारखान्याला वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट पुणेचा " तांत्रिक कार्यक्षमता व ऊस विकास संवर्धनाचा प्रथम पुरस्कार खासदार शरद पवार यांच्या हस्ते स्वीकारताना आमदार अरुणअण्णा लाड, अध्यक्ष शरद लाड,सी.एस.गव्हाणे, संचालक मंडळ.

हेही पहा -----



◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆


Youtube Link
👇

https://youtube.com/@thejanshakatinews5707

Portal Link
👇

www.thejanshaktinews.in

◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆