=====================================
=====================================
कुंडल : वार्ताहर दि. २२ जानेवारी २०२४
प्रभू श्रीरामलल्लाच्या अयोध्येत होत असलेल्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त कुंडल (ता.पलूस) येथे शरदभाऊ लाड युवा प्रतिष्ठानच्या वतीने ५०० किलो लाडूंचा प्रसाद वाटप करुन आनंद व्यक्त केला.
यावेळी क्रांतिअग्रणी डॉ. जी. डी. बापू लाड सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष शरद लाड यांनी गावातील सर्व स्टॉलवर जाऊन लाडू वाटप करून नागरिकांसोबत आनंद व्यक्त केला.
सकाळी गावातून शिव प्रतिष्ठान मित्र मंडळ आणि श्रीराम जन्मोत्सव मंडळाकडून शोभा यात्रा काढून प्रभू श्री रामच्या नावाचा जघोषात करत भक्तिमय वातावरणात हा सोहळा संपन्न झाला.
आनंदोत्सव साजरा करण्यासाठी मा. शरदभाऊ लाड युवा प्रतिष्ठानचे सर्व कार्यकर्ते, श्री राम जन्मोत्सव मंडळाचे कार्यकर्ते, शिव प्रतिष्ठान मित्र मंडळाचे सर्व कार्यकर्ते उपस्थित होते.
अयोध्येत प्रभू श्री श्रीरामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त कुंडलमध्ये लाडूंचा प्रसाद वाटून आनंद व्यक्त करताना क्रांतीचे अध्यक्ष शरद लाड.
हेही पहा --
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆