जिल्ह्यातील पावणे तीन लाख तर राज्यातील सव्वा कोटी विद्यार्थांना मिळणार लाभ
VIDEO
=====================================
=====================================
सांगली / प्रतिनिधी दि.१५ फेब्रुवारी २०२४
द्राक्ष बेदाण्याचा शालेय पोषण आहारात समावेश करण्याचा अध्यादेश अखेर 12 फेब्रुवारी रोजी शासनाने काढला हे स्वाभिमानीच्या लढ्याचे यश आहे , आमच्या सात ते आठ वर्षे सुरू असलेल्या संघर्षाला यश मिळाले असल्याचा दावा करून या बेदाण्याची खरेदी व्यापाऱ्या कडून न करता थेट शेतकऱ्याच्या कडून करावी अन्यथा रस्त्यावर उतरू असा इशारा जिल्हाध्यक्ष महेश खराडे यांनी दिला होता.
दरम्यान या आनंदा प्रीत्यर्थ स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक मेकांना पेढे भरवून आनंद साजरा केला, " लढेंगे जीतेंगे " अशा घोषणा देत सारा परिसर दणाणून सोडला त्यानंतर जिल्हाधिकारी राजा दयानिधी,महापालिका आयुक्त सुनील पवार यांनाही पेढे भरवून शासनाचे आभार मानले.
यावेळी कार्यकर्त्या समोर बोलताना महेश खराडे म्हणाले जिल्ह्यातील सुमारे 2 लाख 75 हजार तर राज्यातील सव्वा कोटी विद्यार्थांना याचा लाभ होणार आहे आठवड्या तून एकदा 50 ते 100 ग्रॅम बेदाणा दिला जाणार आहे. 50 ग्रॅम बेदाणा दिला तरी एका आठवड्याला 5 लाख टन बेदाणा लागेल महिन्याला 20 लाख टन तर वर्षाला 200 लाख टन बेदाण्याची आवश्यकता आहे. याचाच अर्थ उपलंभ बेदाणा कमी पडेल अशी शक्यता आहे.
मात्र या बेदाण्याची खरेदी व्यापाऱ्या कडून न करता थेट शेतकऱ्या कडूनच केली पाहिजे अन्यथा आम्ही त्यासाठीही आंदोलन करू... बेदाण्याचा शालेय पोषण आहारात समावेश करावा यासाठी संघटना गेली आठ ते नऊ वर्षे प्रयत्न करत आहे त्यासाठी गेल्या वर्षी पालक मंत्र्याच्या घरावर चड्डी मोर्चा काढला , जिल्हाधिकारी कार्यालयावर गळ्यात बेदाणा हार मोर्चा काढला , बेदाण्याचे मोफत वाटप करून या प्रश्नाकडे सरकारचे लक्ष्य वेधले त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी चर्चेसाठी मुंबईला बोलावले त्यावेळी त्यांनी आश्वासन दिले होते त्यानंतर अधिवेशनात हा निर्णय घेतला त्याचा अध्यादेश 12 फेब्रुवारी रोजी काढून राज्यातील सर्व शिक्षण अधिकाऱ्यांना तसे आदेश दिले आहेत. हा मोठा निर्णय आहे.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने मुख्यमंत्री , पालकमंत्री यांचे आभार मानले.
यावेळी संजय बेले , संजय खोलखुंबे , अजित हलीगले , प्रकाश मिरजकर , श्रीधर उदगावे , बाळासाहेब भानुसे , महेश संकपाल , शातीनाथ लिंबेकाई , सचिन वसगडे , ऋषिकेश कणवाडे , दीपक कनवाडे , महावीर चौगुले , दीपक मगदूम , सागर बिर्नाळे , सुरेश पाचिबरे यांच्या सह स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆