yuva MAharashtra साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ सांगली ; थेटकर्ज योजनेची चिठ्ठी पध्दतीने लाभार्थ्यांची निवड....

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ सांगली ; थेटकर्ज योजनेची चिठ्ठी पध्दतीने लाभार्थ्यांची निवड....



                                  VIDEO



==============================
==============================

सांगली : वार्ताहर     दि. 21 फेब्रुवारी 2024

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ सांगली कार्यालया मार्फत लघु उद्योग व्यवसायासाठी देण्यात येणारे थेट कर्ज योजने अंतर्गत कर्ज प्रस्तावांची चिठ्ठी पध्दतीने लाभार्थी निवड प्रक्रिया दिनांक २० फेब्रुवारी रोजी डॉ बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन , जुना बुधगाव रोड सांगली येथे पार पडली. 

    निवासी उपजिल्हा अधिकारी सांगली यांचे प्रतिनिधी आनंद गुरव तहसीलदार महसूल विभाग यांच्या अध्यक्षतेखाली व साय्यक आयुक्त समाज कल्याण यांचे प्रतिनिधी कल्याणी दैठंनकर व साहित्यरत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे सांगली जिल्हा कार्यालयाचे जिल्हा व्यवस्थापक लक्ष्मण सिरसागर यांच्या प्रमुख उपस्थितीत सर्व लाभार्थ्यांच्या समोर एका शालेय बालकाच्या हस्ते  चिठ्ठ्या काढून हि निवड प्रक्रिया पारदर्शक पध्दतीने पार पडली.
   

 
   यामध्ये मागील वर्षाचे प्रतिक्षेत असलेले  अर्ज आणि 2023/24 मधील प्राप्त अर्ज असे एकूण अर्जापैकी
  
64 पुरुष आणि 14 महिला अशा 78 लाभार्थ्यांची निवड चिठ्ठी पध्दतीने करण्यात आली. 

   यावेळी जिल्यातील विविध भागातून आलेले लाभार्थी व साहित्यरत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे सांगली जिल्हा कार्यालयाचे सर्व कर्मचारी उपस्थित होते.
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆