yuva MAharashtra स्व.डॉ. पतंगराव कदम साहेब यांना जसे प्रेम दिले तसेच बाळासाहेबांना देखील द्या .. श्रीमती विजयमाला कदम

स्व.डॉ. पतंगराव कदम साहेब यांना जसे प्रेम दिले तसेच बाळासाहेबांना देखील द्या .. श्रीमती विजयमाला कदम


                                  VIDEO



=====================================
==============================



----------------------------------------------------------------
भिलवडी : वार्ताहर      दि. 16 Feb 2024
----------------------------------------------------------------

 सतत मला बाळासाहेबांची (आमदार विश्वजित कदम) काळजी वाटते..शेवटी आईच हृदय आहे. एक मोठा धक्का मी सहन केलेला आहे. ती काळजी मला सतत वाटत असते. परंतु शेवटी मला आनंद आहे कि , तो माझ्या माता-भगिनींच्या उन्नतीसाठी सतत काम करत राहतो याचा मला अभिमान आहे. जरी मला काळजी वाटत असली तरी देखील मी पाठीशी टाकून त्यांना मी प्रोत्साहन देत असते. आज आपण सर्वांनी मला प्रेम दिलं आणि माजीमंत्री स्व.डॉ पतंगराव कदम साहेबांना ज्याप्रमाणे प्रेम, आशिर्वाद दिले त्याच प्रमाणे तुमच्या हाकेला तत्पर हजर राहणाऱ्या आपल्या लाडक्या बाळासाहेबांना (आ.विश्वजित कदम) देखील असेच प्रेम , आशिर्वाद  द्या.. आमच्या पेक्षा जास्त वेळ ते तुमच्या सोबतच असतात असे प्रतिपादन श्रीमती विजयमाला पतंगराव कदम यांनी केले.
  त्या भारती बझार भिलवडी शाखेच्या वतीने भिलवडी येथे आयोजित केलेल्या हळदी-कुंकू कार्यक्रमाच्यावेळी उपस्थित महिलांना मार्गदर्शन करताना बोलत होत्या.

भारती बझार भिलवडी शाखेच्या वतीने बुधवार,दि. १४ फेब्रुवारी २०२४ रोजी जि.प.प्राथमिक मराठी शाळा, अमृत चौक, पाटील गल्ली, भिलवडी ता.पलूस येथे हळदी कुंकू समारंभ व महिलांसाठी मनोरंजनाच्या विविध स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या.

हा कार्यक्रम भारती विद्यापीठ शालेय शिक्षण समितीच्या अध्यक्षा श्रीमती विजयमाला पतंगराव कदम यांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात संपन्न झाला. 

ग्रामपंचायतिचे सरपंच सौ. विद्याताई पाटील यांनी मा.विजयमाला पतंगराव कदम यांचे स्वागत केले तर  ग्रामपंचायतिच्या सर्व महिला सदस्यांनी  पंचक्रोशीतून आलेल्या सर्व महिला पदाधिकाऱ्यांचे स्वागत केले.

  एमपीएससी परिक्षेत यश संपादन केलेल्या कु. शैलजा चव्हाण व कु. पूजा माने यांचा तर महाराष्ट्र दिव्यांग महिला क्रिकेट संघामध्ये निवड झालेल्या सौ.जयश्री घोडके यांचा यथोचित सन्मान यावेळी श्रीमती विजयमाला कदम यांच्या शुभ हस्ते करण्यात आला.


 या कार्यक्रमासाठी भिलवडी गावच्या सरपंच सौ.विद्याताई पाटील, भिलवडी स्टेशन गावच्या सरपंच सावित्री (काकी) यादव,अंकलखोप गावच्या सरपंच बेबीताई पाटील,खंडोबाचीवाडी गावच्या सरपंच सौ.आश्विनीताई मदने, चोपडेवाडी गावच्या उपसरपंच सुप्रियाताई माने,भिलवडीच्या माजी जि.प.सदस्या भारतीताई गुरव, धनगावच्या माजी जि.प. सदस्या सौ.अरुणाताई कुर्लेकर, नागठाणच्या माजी सरपंच सौ. जयश्रीताई मांगलेकर, माजी सरपंच सौ.वृषालीताई पाटील,  संतगावच्या माजी सरपंच सौ.माधुरीताई सावंत, भिलवडीच्या माजी सरपंच व विद्यमान सदस्य सौ. सविता महिंद-पाटील , सौ.स्वप्नाताई चौगुले, माजी सरपंच शारदा (काकी) पाटील,पलूस कडेगाव विधानसभा युवक काँग्रेस उपाध्यक्षा सौ.प्रणालीताई पाटील यांच्या सह अंकलखोप आणि भिलवडी जि.प.गटातील महिला सरपंच,उपसरपंच ग्रामपंचायत सदस्या,जि.प.,पं.समिती सदस्या , विविध संस्था , संघटना व सर्व पक्षीय राजकीय महिला पदाधिकारी,अंगणवाडी सेविका, मदतनीस,आशा सेविका व पंचक्रोशीतील माता-भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

ग्रामपंचायत सद्स्या सौ.सीमा शेटे व भारती बझारचे जनरल मँनेंजर श्री.जगन्नाथ शिंदे यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले.

◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆
Tags