yuva MAharashtra अकबर बिरबला ची आधुनिक गोष्ट ----- तृणधान्यांचे महत्त्व

अकबर बिरबला ची आधुनिक गोष्ट ----- तृणधान्यांचे महत्त्व



=====================================
=====================================

अकबर बिरबला ची आधुनिक गोष्ट ----- तृणधान्यांचे महत्त्व

अकबर – मी तुला ३ प्रश्न विचारेन पण तू मात्र एकच उत्तर द्यायचं.. ते प्रश्न असे...

♦️ गेल्या ५० वर्षांत जगभरात डायबेटीस का वाढला ? 

♦️ जगभरातल्या चिमण्यांची संख्या का कमी झाली ?

♦️ नोवाक जोकोव्हिच जगातला नंबर १ टेनिस प्लेयर का बनला ?  

आता या तिन्ही प्रश्नांचे एकच उत्तर दे.        

बिरबलवाह खाविंद, काय प्रश्न विचारला आपण. या प्रश्नाचं उत्तर आहे *तृणधान्य किंवा मिलेटस्.* बरोबर ? 

अकबरअगदी बरोबर. पण तुला लगेच उत्तर कसं काय सुचतं रे ?
मग या तिन्ही प्रश्नांचे उत्तर तृणधान्य कसे ते तूच समजावून सांग आता..

बिरबलकाही हरकत नाही हुजूर. आता डायबेटीस का वाढला ? तर गेल्या ५०-६० वर्षांत लोकांचे भात आणि गहू खाण्याचे प्रमाण खूपच वाढले आहे. ज्वारी, बाजरीसारखी तृणधान्य खायचे लोकांनी बंद केले. त्यात पुन्हा हे गहू तांदूळ आता संकरित बियाण्यांपासून पिकवतात आणि पॉलिश तर इतके करतात कि आजिबात फायबर शिल्लक ठेवत नाहीत. असं धान्य खाल्लं की त्यातली साखर लगेच रक्तात उतरते आणि मग डायबेटीस होतो. 

अकबरबरं मग त्या चिमण्या कुठे उडून गेल्या ?

बिरबलत्याचं असं आहे खाविंद. बाजरी, नाचणी, राळे यासारखी छोटी तृणधान्य हे चिमण्यांचे आवडते खाद्य आहे. पण आता शेतात सगळीकडे गहू आणि तांदूळ पिकतो. शेतात तृणधान्यच नाही तर बिचाऱ्या चिमण्या खाणार तरी काय ?

अकबरआणि त्या तिसऱ्या प्रश्नाचं काय ? आणि हा जोकोव्हिच कोण ?    

बिरबलधीर धरा खाविंद सांगतो सांगतो. नोव्हाक जोकोविच हा सर्बियाचा टेनिस प्लेयर आहे. आज तो जगात नंबर १ आहे. पण त्याच्या करीयरची सुरवात एवढी चांगली नव्हती कारण त्याचा स्टॅमिना कमी होता. तो पटकन थकायचा कधीकधी तर विनिंग पोझिशनमधून त्याने मॅचेस सोडून दिल्या आहेत. मग एके दिवशी त्याला एक डाएटिशीयन भेटला. त्याने जोकोविचला गव्हातल्या ग्लुटेनची ॲलर्जी असल्याचे सांगून आहारातून गहू पूर्णपणे बंद करण्याचा सल्ला दिला. मग त्याने मिलेट खायला सुरुवात केली. आणि काय आश्चर्य ? जोकोविचचा थकवा जणू गायब झाला. आज त्याच्या नावावर जगातल्या सर्वाधिक २३ ग्रॅण्डस्लॅम टायटल आहेत आणि तो जगातील नंबर १ प्लेयर आहे. 


मित्रांनो गोष्ट जरी काल्पनिक असली तरी त्यात विचारलेले प्रश्न आणि त्यांची उत्तरं वास्तवावर आधारित आहेत. संयुक्त राष्ट्रसंघ अर्थात United Nations ने २०२३/२४ हे वर्ष ‘जागतिक भरडधान्य वर्ष’ म्हणजेच International year of Millets म्हणून घोषित केले आहे. यामागे तृणधान्यांचे महत्त्व जगभर पोहोचावे हा उद्देश आहे.

संकलन- 
निसर्ग उपचार तज्ञ 
डॉ. प्रमोद ढेरे, पिंपरी-चिंचवड, पुणे. 
आरोग्यविषयक व्याख्याते व लेखक 
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆