=====================================
=====================================
भिलवडी : वार्ताहर ३ फेब्रुवारी २०२३
भिलवडी सार्वजनिक वाचनालयाचे भूतपूर्व
अध्यक्ष स्व.काकासाहेब चितळे यांच्या पुण्यस्मरण दिनानिमित्त सुवर्ण महोत्सवी वाचन कट्टा उपक्रमांतर्गत भिलवडी येथे अभिवाचन स्पर्धेची पहिली फेरी संपन्न झाली.
सार्वजनिक वाचनालय भिलवडी,चितळे डेअरी व ऑरेंज एफ.एम.यांचे संयुक्त विद्यमाने अभिवाचन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. भिलवडी केंद्रामध्ये संपन्न झालेल्या पहिल्या फेरीचा निकाल पुढीलप्रमाणे...
प्रथम क्रमांक -
सौ. विजया घाटगे,श्री.नंदकुमार
कुरुंदवाडकर (सांगली), द्वितीय - स्वरगंध संगीत विद्यानिकेतन सौ.प्राजक्ता कुलकर्णी व सहकारी ,तृतीय - सौ.उर्मिला हणमंतराव
डिसले,सौ. शिवांगी रविंद्र कुलकर्णी,
उत्तेजनार्थ - बाबासाहेब चितळे महाविद्यालय भिलवडी.
या स्पर्धेमध्ये एकूण सात संघ सहभागी झाले.संजय पाटील,संदिप नाझरे,शरद जाधव यांनी स्पर्धेचे परीक्षण केले.
वाचनालयाचे कार्यवाह सुभाष कवडे यांनी सर्वांचे स्वागत करून भिलवडी सार्वजनिक वाचनालय राबवित असलेल्या विविध उपक्रमांविषयी माहिती दिली.
यावेळी भिलवडी वाचनालयाचे अध्यक्ष गिरीश चितळे,ऑरेंज एफ.एम.चे यशवंत कुलकर्णी, वाचनालयाचे संचालक डी.आर.कदम,जयंत केळकर,क्रांती सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक महावीर चौगुले,चितळे डेअरी चे व्यवस्थापक शशिकांत कुलकर्णी,प्रा.डॉ.सुरेश शिंदे आदींसह वाचक,रसिक उपस्थित होते.याप्रमाणेच सांगली व कवठेएकंद येथील वाचनालयात अभिवाचन स्पर्धा घेण्यात आली.बुधवार दिनांक ७ रोजी सकाळी १० वा.भिलवडी सार्वजनिक वाचनालयात प्रत्येक केंद्रातून निवडलेले चार संघ अशा बारा संघामध्ये अंतिम स्पर्धा घेण्यात येणार आहे.
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆