VIDEO
👇
=====================================
=====================================
भिलवडी : वार्ताहर दि. 27 फेब्रुवारी 2024
भिलवडी ता.पलूस येथे जायंट्स ग्रुप ऑफ भिलवडी यांच्या वतीने दिनांक 26 फेब्रुवारी रोजी आयोजित करण्यात आलेल्या मासिक सभेमध्ये शालेय विद्यार्थी तसेच सहकारी व सामाजिक क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या विविध मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.
यामध्ये भिलवडी शिक्षण संस्थेच्या अकरावी मध्ये शिकणाऱ्या कुमारी श्रुती शशिकांत पाटील हिची राज्यस्तरीय शालेय सिकाई मार्शल आर्ट खेळामधे सुवर्णपदक व राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाल्याबद्दल, त्याचप्रमाणे कुमारी सानवी राजेंद्र कोळी हिची राज्यस्तरीय चौदा वर्षाखालील मुलींच्या व्हॉलीबॉलच्या महाराष्ट्र संघातुन राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली, या शालेय विद्यार्थ्यांच्या यशस्वी कामगिरीबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच आप्पासाहेब चोपडे पतसंस्थेमध्ये संचालक पदी निवड झाल्याबद्दल जायंट्स ग्रुपचे सदस्य श्री. शशिकांत चौगुले व संभाजी महिंद यांचा सत्कार करण्यात आला. जायंट्स ग्रुपचे कार्यवाह श्री निवास गुरव यांना ज्ञानक्रांती सामाजिक सेवाभावी संस्था मंगळवेढा यांचे वतीने समाजभूषण पुरस्कार देऊन गौरव करण्यात आलेबद्दल जायंट्स ग्रुप ऑफ भिलवडीमार्फत सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमासाठी जायंट्स ग्रुपचे एनसीएफ मेंबर उद्योजक श्री गिरीशजी चितळे, जायंट्स ग्रुपचे अध्यक्ष श्री सुबोध वाळवेकर, उपाध्यक्ष श्री महावीर चौगुले, श्री बाळासो महिंद,खजिनदार श्री विशाल सावळवाडे, डॉ. जयकुमार चोपडे, डी आर कदम सर तसेच जायंट्स ग्रुपचे सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆