======================================
======================================
कुंडल : वार्ताहर दि. २२ फेब्रुवारी २०२४
आरक्षण ही खैरात नाही, मराठा समाजाला चुकीच्या दिशेने न्हेलं जातंय, राजकीय भूलथापांना बळी पडून बहुजनांनी एकमेकांत तेढ निर्माण करू नये कारण आज " ना हिंदू, ना मुसलमान खतरे में हैं.. सिर्फ बहुजन समाज खतरे में हैं. असे मत राष्ट्रवादी ओबीसी सेलचे प्रदेशाध्यक्ष राज राजापुरकर यांनी व्यक्त केले.
क्रांतीच्या या भूमीत क्रांतिअग्रणी जी.डी. बापूंच्या आशीर्वादाने बहुजनांच्या हितासाठी काढलेल रॅली सार्थकी ठरेल...राज राजापुरकर
ते कुंडल (ता.पलूस) येथे बहुजन जुडेगा, देश बडेगा या राज्यभर जाणाऱ्या रॅली दरम्यान आले असता बोलत होते. यावेळी आमदार अरुणअण्णा लाड, क्रांतीचे अध्यक्ष शरद लाड प्रमुख उपस्थित होते.
राजापूरकर म्हणाले, आमची ही रॅली राज्यभरातून २५०० किलोमीटरचा प्रवास करणार आहे. खासदार शरद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली ही रॅली असून बहुजनांना त्यांचे हक्क समजावेत, त्यांना जागृत करण्यासाठी बहुजनांचा आवाज राज्यभर न्हेत आहोत. जेव्हा बहुजन एकत्र येतील तेव्हा एक मोठी ताकद निर्माण होईल.
लोकशाहीत जे चालत नाही नेमकं तेच शासनाकडून होत आहे यात बहुजन भरडला जातोय. निवडणुकीसाठी बहुजनांचा वापर केला जातोय. येणाऱ्या निवडणुकीत याच बहुजनांवर पैशांचा पाऊस पाडला जाईल पण त्याला कोणीही बळी पडू नये असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
मराठा समाजाला इतर राज्याप्रमाणे न्यायालयात टिकेल असे अधिकचे आरक्षण द्यावे. आत्ताचे हे आरक्षण म्हणजे मराठ्यांची फसवणूक करून फक्त भांडणे लावण्याचा आणि राजकीय पोळी भाजण्याचा उद्देश यातून दिसून येतोय. हिम्मत असेल तर जातीय जनगणना करावी असे आव्हान शेवटी त्यांनी सध्याच्या सरकारला केले.
यावेळी सुशांत देवकर, डी. एस. देशमुख, मोहन पाटील, सुरेश शिंगटे, सादिक खाटीक, ओबीसी सेल तालुकाध्यक्ष अरुण सुतार, रजाक मुलानी, संतोष जाधव, सलीम बेग यांचेसह कार्यकर्ते उपस्थित होते.
राष्ट्रवादी ओबीसी सेलचे प्रदेशाध्यक्ष राज राजापूरकर याचे स्वागत आमदार अरुण लाड यांनी केले. यावेळी शरद लाड, डी.एस.देशमुख, सुशांत देवकर, मोहन पाटील.
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆