======================================
======================================
हिवाळ्यातल्या कोरड्या- थंड हवेमुळे त्वचा कोरडी होते आणि तिच्यावरचं टॅनिंग वाढतं.
वारंवार पार्लरमध्ये जाऊन फेशियल- क्लिनअप करणंही शक्य नसतं. म्हणूनच हा एक घरगुती उपाय पाहून घ्या...
हा उपाय करण्यासाठी...
सगळ्यात आधी एका वाटीत १ चमचा कॉफी पावडर आणि १ चमचा साखर घ्या.
◼️ या मिश्रणात आता १ चमचा लिंबाचा रस आणि १ चमचा मध घाला.
◼️ चिमूटभर हळद टाकून हे मिश्रण आता व्यवस्थित हलवून घ्या. थोडंसं हलवलं की साखर विरघळून जाईल आणि मऊ पेस्ट तयार होईल.
◼️ ही पेस्ट आता चेहऱ्यावर, मानेवर, गळ्यावर लावा आणि १० मिनिटे तशीच राहू द्या.
◼️ त्यानंतर चेहरा स्वच्छ धुवून टाका. चेहरा धुतल्यानंतर मॉईश्चरायझर लावा.
◼️ यामुळे त्वचेवरचं टॅनिंग, डेड स्किन निघून जाईल आणि त्वचा स्वच्छ, नितळ, चमकदार दिसेल.
संकलन-
निसर्ग उपचार तज्ञ
डॉ. प्रमोद ढेरे, पिंपरी-चिंचवड, पुणे.
आरोग्यविषयक व्याख्याते व लेखक
हेही पहा ----
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆