====================================
पलूस (प्रतिनिधी) : दि. 22 फेब्रुवारी 2024
मध्य रेल्वे पुणे विभागातील आमणापूर येळावी मार्गावरील गेट नं.115 नजीकचा भुयारी पुल दुरुस्त करावा किंवा रेल्वे गेट 115 पूर्ववत सुरु करावे,आमणापूर स्टेशनवर पुणे कोल्हापूर (पूर्ववत) थांबवण्यात यावी,तसेच कोयना एक्सप्रेस, महाराष्ट्र एक्सप्रेस, पुणे कोल्हापूर साप्ताहिक एक्सप्रेस या नवीन गाड्यांना थांबा मिळावा, दक्षिण बाजूचा प्लॅटफॉर्म उंच करावा, शेतकऱ्यांना जाणे येनेसाठी दक्षिण बाजूला गेट नं.114 ते मळवाट रस्ता करून मिळावा, प्रवाशी व शेतकऱ्यांना येण्यासाठी उत्तर बाजूला स्टेशनवर येनेसाठी पूर्व बाजूचा रस्ता करावा, इत्यादी मागण्या ग्रामपंचायत आमणापूर व विठ्ठलवाडी येथील सरपंच, उपसरपंच, सदस्य व सामाजिक कार्यकर्ते यांनी मध्य रेल्वे पुणेच्या डिव्हिजनल रेल्वे मॅनेजर श्रीमती इंदुमती दुबे मॅडम यांच्याकडे निवेदनाद्वारे केल्या आहेत, भविष्यात मागण्या मान्य न झाल्यास या भागातील शेतकरी, विद्यार्थी व ग्रामस्थांना घेऊन रेल रोको आंदोलन करावे लागेल असा इशारा निवेदनाद्वारे करण्यात आला आहे,
या निवेदनावर आमणापूरचे माजी सरपंच आकाराम भाऊ पाटील, क्रांती साखर कारखाना माजी संचालक पोपटराव फडतरे, वसंतदादा साखर कारखाना संचालक सुरेश भैय्या पाटील, आमणापूर तंटामुक्तीचे अध्यक्ष बाजीराव नाना पाटील, विकास सोसायटीचे चेअरमन वसंतराव आण्णा पवार,मध्य रेल्वेचे माजी सदस्य (राज्यमंत्री दर्जा) मा. श्रीकृष्ण औटे (भाऊ),आमणापूरच्या लोकनियुक्त सरपंच सौ.बालिका पाटील,उपसरपंच सौ.मोनिका अनुगडे,विठ्ठलवाडीच्या लोकनियुक्त सरपंच सौ.दिपाली कोळी,उपसरपंच हणमंत घाडगे,आमणापूर ग्रामपंचायत विद्यमान सदस्य सर्वश्री शिवाजी देशमुख, राहुल तातुगडे,संदीप काटवटे,ज्ञानेश पाटील, राजेंद्र पाटील, सौ.अंजना पाटील, सौ.प्रियंका कोकळे,सौ.शारदा राडे,विठ्ठलवाडीचे विद्यमान सदस्य श्री.अभिजीत औटे, श्रीमती छाया सावंत, सौ.शोभा औटे, माजी सदस्य शरद औटे,सामाजिक कार्यकर्ते नामदेव औटे, हणमंत पवार, इत्यादी लोकप्रतिनिधींच्या सह्या निवेदनात आहेत,निवेदनात पुढे म्हंटले आहे की पलूस हे 30 हजार लोकवस्तीचे शहरी नगरपरिषद गाव आमणापूर रेल्वे स्टेशन नजीक असल्यामुळे नवीन गाड्यांना थांबा दिल्यास हजारो रुपयांचे उत्पन्न वाढणार आहे, दि.29/01/23 रोजी नवीन आमणापूर रेल्वे स्टेशनचा उद्घाटन सोहळा व सातारा कोल्हापूर डेमु एक्सप्रेस गाडीचा स्वागत समारंभ सांगलीचे खासदार संजय काका पाटील, पुणे मंडल मधील अतिरिक्त रेल प्रबंधक श्री.ब्रिजेश कुमार सिंह, वरिष्ठ वाणिज्य प्रबंधक डॉ.मिलिंद हिरवे, सहाय्यक ऑपरेशन व्यवस्थापक संजय कुमार, सहाय्यक सुरक्षा आयुक्त स्वरूप कुमार गंगोपाध्याय व इतर सर्व वरिष्ठ अधिकारी, पलूस तालुक्यातील सर्व लोकप्रतिनिधी व ग्रामस्थ यांच्या उपस्थितीत संपन्न झाला,यावेळी आमचे लोकप्रतिनिधी खासदार संजय काका पाटील व आपल्या उपस्थित असलेले सर्व अधिकारी यांनी प्रत्यक्ष पाहणी करून आम्ही केलेल्या मागण्यांबाबत सकारात्मक चर्चा केली होती व उचित कार्यवाही करण्याचे आश्वासन आपल्या अधिकाऱ्यांनी लोकप्रतिनिधी व ग्रामस्थांना दिले होते,आम्ही आपल्या रेल्वे प्रशासनाबरोबर वेळोवेळी पत्रव्यवहार करून याचा पाठपुरावा करीत आहोत, परंतु आपल्या प्रशासनाकडून कोणतीही कार्यवाही झालेली नाही,
सध्या आमणापूर रेल्वे स्टेशनवर सातारा कोल्हापूर ही एकच डेमु गाडी थांबत असून,या गाडीतून नोकरी करणारे पासधारक 43 प्रवाशी,व विद्यार्थी पासधारक 32 प्रवाशी व तिकीट काढून 8/10 प्रवाशी असे एकूण 80/85 प्रवाशी प्रवास करत आहेत,यामुळे रेल्वेच्या उत्पन्नात हजारो रुपयांची वाढ होत आहे,म्हणून नवीन रेल्वे गाड्यांना थांबा दिल्यास रेल्वेच्या उत्पन्नात लाखो रुपयांची वाढ होणार आहे, निवेदनाच्या प्रति पंतप्रधान नरेंद्र मोदी जी, रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे पाटील, जनरल मॅनेजर मुंबई राम करण यादव, खासदार संजय काका पाटील, आमदार डॉ.विश्वजित कदम, आमदार अरुण आण्णा लाड, माजी आमदार पृथ्वीराज बाबा देशमुख, जिल्हाधिकारी सांगली, तहसीलदार पलूस,पोलीस स्टेशन पलूस, रेल्वे सुरक्षा बल किर्लोस्करवाडी स्टेशन,स्टेशन मास्तर किर्लोस्करवाडी, यांना देण्यात आल्या आहेत,
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆