yuva MAharashtra क्राईम : शेअर मार्केटमध्ये जास्त परतावा मिळवून देतो सांगत लाखोंची फसवणूक करणाऱ्या दाम्पत्याला सांगली आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलीसांनी केले गजाआड...

क्राईम : शेअर मार्केटमध्ये जास्त परतावा मिळवून देतो सांगत लाखोंची फसवणूक करणाऱ्या दाम्पत्याला सांगली आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलीसांनी केले गजाआड...


=====================================
=====================================


सांगली वार्ताहर : दि. २४ फेब्रुवारी २०२४

शेअर बाजारात जास्त परतावा मिळवून देण्याच्या बहाण्याने नागरीकांना लाखोंचा गंडा घातल्याची घटना मिरज येथे उघडकीस आली आहे. याप्रकरणी सांगली आर्थिक गुन्हे शाखेच्या  पोलिसांनी दोन आरोपींना मिरज येथून अटक केली आहे. कुलदीप चंद्रकांत काशीद व त्याची पत्नी सौ. स्मिता कुलदीप काशीद दोघे रा. मिरज अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. 
 आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक महेंद्र दोरकर यांनी दिलेल्या माहितीनुसार सन २०२१ ते दिनांक ११/०१/२०२४ या कालावधीत सदर गुन्हयातील आरोपी कुलदीप चंद्रकांत काशीद व त्याची पत्नी सौ. स्मिता कुलदीप काशीद  यांनी के. के. कन्सल्टन्सी स्टॉक मार्केट रिसर्च अँण्ड अँनालिसीस नावाची कंपनी स्थापन केली होती. त्या कंपनीत गुंतवणूक केलेल्या रकमेवर दरमहा ७ ते ९ टक्के परतावा देण्याचे आमिष दाखवून मिरज येथील सौ. आरती रविचंद्र होसपुरे या महिलेने स्वताची व अन्य गुंतवणूकदारांची आरोपी कुलदीप चंद्रकांत काशीद व त्याची पत्नी सौ. स्मिता कुलदीप काशीद यांनी ४३,८८,८०० /- रु. ची आर्थिक फसवणूक केल्याची फिर्याद दि. १/२/२०२४ रोजी पोलीस अधीक्षक सांगली यांचेकडे केली होती. सदरची तक्रार ही अत्यंत क्लिष्ट व गुंतागुंतीची असल्याने पोलीस अधीक्षक सांगली यांनी सदरची तक्रार चौकशी व कार्यवाही करीता आर्थिक गुन्हे शाखा सांगली येथे वर्ग केलेली होती.

गुन्हयाच्या तपासादरम्यान १३ गुंतवणूकदारांनी आर्थिक गुन्हे शाखा येथे हजर राहून जबाब दिले असून आरोपींनी केलेल्या फसवणूकीची रक्कम ही आजपर्यंत ८८,४१,३००/- एवढी असल्याचे निष्पन्न झालेली आहे.

दोन्ही आरोपी फरार.. दोघांनाही पोलीसांनी शिताफीने पकडले

सदर  गुन्हयातील दोन्ही आरोपी फरार झालेले होते. त्यांची गोपनीय माहिती काढून यातील  स्मिता कुलदीप काशीद या महिला आरोपीला शिताफीने ताब्यात घेऊन कसून तपास केला असता तिचा सदर गुन्ह्यात सक्रिय सहभाग असल्याचे अढळल्यानंतर तीला दि.०९/०२/२०२४ रोजी अटक करण्यात आली होती. सध्या ती न्यायालयीन कोठडीत आहे.

  सदर गुन्हयातील मुख्य फरार आरोपी कुलदीप चंद्रकांत काशीद हा मिरज शहर येथे येणार असल्याची गोपनीय माहिती काढून त्यास आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने दि. २२/०२/२०२४ रोजी  मिरज येथून शिताफीने अटक केलेली आहे. सदर आरोपीला दि. २३/०२/२०२४ रोजी मा. न्यायालयासमक्ष हजर केले असता मा.न्यायालयाने आरोपीस दि. ०२/०३/२०२४ रोजीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. 

फसवणूक करणाऱ्या आरोपींची चैन ब्रेक

आर्थिक गुन्हे शाखा सांगली पथकाने सदर गुन्हयात आरोपींचा सक्रीय सहभाग निष्पन्न करून दोन्ही आरोपींना अटक करून सदर गुन्हयातील आरोपींची चैन ब्रेक केली आहे.


सदरची यशस्वी कामगिरी मा. पोलीस अधीक्षक श्री संदीप घुगे , अपर पोलीस अधीक्षक श्रीमती रितू खोखर मॅडम यांचे मार्गदर्शानाखाली
 पोलीस निरीक्षक महेंद्र दोरकर , सहा. पो. नि. आण्णासो बाबर , पोलीस अंमलदार आयेशा मुजावर , रिचर्ड स्वामी , रमेश कोळी , दिपाली पाटील , अनुराधा आवळे , रेवती जंगले यांनी पार पाडली.
 सदर गुन्हयाचा पुढील तपास सहा. पोलीस निरीक्षक आण्णासो बाबर हे करीत आहेत.

नागरिकांना आवाहन

आर्थिक गुन्हे शाखा सांगली यांचे मार्फत नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की, ज्या नागरिकांची उपरोक्त आरोपींनी फसवणूक केलेली आहे. त्यांनी गुंतवणूकीबाबतच्या कागदपत्रांसह आर्थिक गुन्हे शाखा सांगली कार्यालयात संपर्क साधावा... 
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆ ◆◆◆◆◆◆
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆


Tags