yuva MAharashtra कोणत्याही परिस्थितीत सांगली लोकसभा लढायची आणि जिंकायाची ... महेश खराडे

कोणत्याही परिस्थितीत सांगली लोकसभा लढायची आणि जिंकायाची ... महेश खराडे


                              VIDEO


=====================================
=============================

पलूस प्रतिनिधी : दि. 2 फेब्रुवारी 2024

कोणत्याही परिस्थितीत सांगली लोकसभा लढायची आणि जिंकायाची असा निर्धार स्वाभिमानी पक्षाचे जिल्हाध्यक्ष महेश खराडे यांनी व्यक्त केला.
पलूस तालुक्यातील कार्यकर्ते, पदाधिकारी यांची संयुक्त बैठक पलूस येथे गुरुवार दि. 1 फेब्रुवारी रोजी संपन्न झाली त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी संघटनेचे जिल्हाध्यक्ष पोपट मोरे , कार्याध्यक्ष संदीप राजोबा , राजेंद्र पाटील , राजेंद्र माने उपस्थित होते
खराडे म्हणाले ही निवडणूक अवघड आहे पण अशक्य नाही गेल्या दहा वर्षात आपण क्षेतकरी आर्थिक दृष्ट्या सक्षम करण्यासाठी केलेले काम लोकांच्या पर्यंत जावून सांगितले पाहिजे ऊस , दूध , द्राक्ष , बेदाणा आदींसाठी केलेली यशस्वी आंदोलने याशिवाय कडकनाथ कोबडी फेक आंदोलन , जिल्हा बँकेत वन टाईम सेटलमेंट योजनेसाठी केलेली आंदोलन त्यामुळे शेतकऱ्याचा झालेला फायदा , यंदा ऊस दर शेतकऱ्यांना द्यायचाच नाही म्हणून सर्व पक्षीय कारखानदाराची झालेली गट्टी, चिकाटीने आंदोलन करून मिळवलेला वाढीव पावणे दोनशे दर, बेदाण्याचा शालेय पोषण आहारात समावेश करण्यास शासनास भाग पाडले त्यामुळे बेदाणा उत्पादकांचा होणारा फायदा , शेतकऱ्याच्या हितासाठी तासगाव येथे होणारे शिवार कृषी प्रदर्शन, ऊसाला वाढीव दर मिळावा यासाठी काढलेली 600 किमी ची पदयात्रा आदींची माहिती घर टू घर घर जावून दिली पाहिजे. पै-पाहुणे, नातेवाईक, मित्र यांच्या पर्यंत जावून संघटनेचे काम, पोहचवले तर निश्चितपणे लोक आपल्याला सहकार्य करतील पण त्यांच्यापर्यंत जायला पाहिजे असे आवाहन त्यांनी केले.

यावेळी बोलताना पोपट मोरे म्हणाले सर्व कार्यकर्त्यांनी प्रामाणिक काम केल्यास विजय आपला आहे तर संदीप राजोबा म्हणाले कि, आपण सगळे मावळे आहोत मावळे इतिहास घडवू शकतात.


यावेळी राजेंद्र माने , राजेंद्र भाऊ पाटील , बाळासाहेब शिंदे , धन्यकुमार पाटील , नागेश खामकर , रोहित वारे , महेश चौगुले , विश्वजित गायकवाड , प्रवीण कोले , संदीप चौगुले , अमोल मिस्त्री , धनंजय चौगुले , पोपट उपाध्ये , नितीन पाटील , संजय रोकडे , स्वप्नील रोकडे , कुमार पाटील , मागलेकर बाबुराव शिंदे , सागर सावंत , दत्ताभाऊ कांबळे , पे. रामभाऊ पवार , भुजंग पाटील , गुलाब यादव , संदीप पवार, विश्वास भोसले , मेजर दिलीप पवार, बाळासाहेब जाधव , इम्रान पटेल , आनंद जंगम , दत्ता कुंभार , सुभाष शिंदे , रामदास महिंद , सुधीर जाधव , प्रकाश देसाई , शिवाजी पाटील , उत्तम पाटील , प्रदीप पाटील , आकाश साळुंखे , तानाजी धनवडे , अख्तर संदे , मुकेश पाटील , प्रकाश माळी , विष्णू माळी आदीसह मोठ्या संख्येने कार्यकर्ते ,पदाधिकारी शेतकरी उपस्थित होते.
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆