yuva MAharashtra पारधी पुनर्वसनासाठी पलूस तहसील समोर दलित महासंघाचे 'बेमुदत थाळीनाद आंदोलन' ; पुनर्वसनाकडे गांभीर्याने न पहिल्यास आंदोलन अधिक तीव्र - डॉ.सुधाकर वायदंडे यांचा इशारा...

पारधी पुनर्वसनासाठी पलूस तहसील समोर दलित महासंघाचे 'बेमुदत थाळीनाद आंदोलन' ; पुनर्वसनाकडे गांभीर्याने न पहिल्यास आंदोलन अधिक तीव्र - डॉ.सुधाकर वायदंडे यांचा इशारा...

  
                             VIDEO



========================
========================

पलूस वार्ताहर :         दि. ५ फेब्रुवारी २०२४

पलूस तालुक्यातील पारधी पुनर्वसन व अन्य प्रलंबित मागण्यासाठी दलित महासंघ व आदिवासी पारधी हक्क अभियानाच्या वतीने राज्याध्यक्ष डॉ. सुधाकर मधुकर वायदंडे यांच्या नेतृत्वाखाली पलूस तहसील कार्यालयासमोर 'बेमुदत थाळीनाद आंदोलन' सुरु करण्यात आले.
            आंदोलकांनी 'थाळीनाद'करून प्रचंड घोषणाबाजी केली त्यामुळे तहसील आवारातील वातावरण दिवसभर तणावग्रस्त झाले होते. 
                 निवेदनात म्हटले आहे,दलित महासंघाचे संस्थापक अध्यक्ष दिवंगत प्रा.मधुकर वायदंडे यांच्या नेतृत्वाखाली आदिवासी पारधी समाजाचे संपूर्ण पुनर्वसन व्हावे या मागणीसाठी गेल्या अनेक वर्षांपासून सातत्याने आंदोलने,मोर्चाच्या माध्यमातून लढा सुरु आहे.त्यामुळे शासन स्तरावर पुनर्वसन करणेबाबत आदेश परीत झालेले आहेत.
             अनेकवेळा जिल्हाधिकारी कार्यालय,तहसील कार्यालय, पंचायत समिती समोर बेमुदत धरणे आंदोलनासह विविध आंदोलने झालेली आहेत जिल्ह्यामध्ये इतर तालुक्यात पुनर्वसनाबाबत उपाययोजना होत असताना पलूस तालुक्यात प्रशासनाची उदासीनता का ? पारधी समाजाचे पुनर्वसन न करता त्यांनी पुन्हा गुन्हेगारीकडे वळावे अशी प्रशासनाची मानसिकता आहे का?यासाठी ठोस उपाययोजणांची गरज असताना प्रशासनाने मात्र प्रत्येक वेळी वेळ मारून नेण्याचा प्रयत्न केलेला आहे  एक गाव एक पारधी कुटुंब या योजनेप्रमाणे तालुक्यातील सांडगेवाडी व मोराळे या गावामध्ये कुटुंबाचे प्रशासनाच्या आदेशाने पुनर्वसन केले आहे. परंतु अजूनही त्यांना जागा मोजून दिलेली नाही परीणामी जागा नावावर न झालेने घरकुल तसेच कोणत्याही शासकीय योजनेचा लाभ मिळालेला नाही.    
             सदर 'थाळीनाद आंदोलनाची' गंभीर दखल घेऊन पुनर्वसनाबाबत तत्काळ निर्णय घ्यावा व हा प्रश्न मार्गी लावण्यात यावा अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा डॉ.सुधाकर वायदंडे यांनी दिला आहे.
           आंदोलनामध्ये दलित महासंघाचे सदाभाऊ चांदणे,शामराव क्षीरसागर,दिनकर नांगरे,संभाजी मस्के आदिवासी पारधी हक्क अभियानाचे जितेंद्र काळे,टारझन पवार,इंद्रजित काळे,राजू काळे,अशोक पवार,उषा चव्हाण, जयश्री चव्हाण,काजल चव्हाण,शांताराम चव्हाण,चरण पवार,प्रकाश चव्हाण,राजू चव्हाण,फाळकेश चव्हाण यांच्यासह मोठ्या प्रमाणात पुरुष व महिला सहभागी झाल्या होत्या.
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆