=====================================
=====================================
भिलवडी वार्ताहर : दि. 2 फेब्रुवारी 2024
स्व. काकासाहेब चितळे यांचे स्मृतीदिनानिमित्त सार्वजनिक वाचनालय भिलवडी यांच्या वतीने ६ , ७, ८ फेब्रुवारी रोजी सुवर्णमहोत्सवी वाचनकट्टा समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे अशी माहिती कार्यवाह सुभाष कवडे यांनी दिली.
" वाचाल तरच वाचाल " या उक्तीस अनुसरुन स्व. काकासाहेब चितळे हे काम करत होते. वाचन चळवळ वृद्धिंगत करण्यासाठि ते नेहमी आग्रहि होते. त्यांच्या पुढाकारातुन भिलवडी वाचनालयात वाचन कट्टा सुरु झाला होता आत्ता हा वाचनकट्टा सुवर्ण महोत्सव साजरा करत आहे. अशी माहिती सुभाष कवडे यांनी दिली
मंगळवार दिनांक ६ फेब्रुवारी सकाळी ग्रंथ प्रदर्शन व विक्री (पुस्तकवाले, पुणे) मकरंद चितळे यांच्य हस्ते या प्रदर्शनाचे उद्घाटन होणार आहे. तसेच दुपारी ४ ते ते ५ यावेळेत शांतता, आम्ही पुस्तके वाचत आहोत हा उपक्रम सार्वजनिक वाचनालय भिलवडी, भिलवडी शिक्षण संस्था तसेच परिसरातील इतर संस्थामध्ये राबवला जाणार आहे.
दिनांक ७ फेब्रुवारी रोजी सकाळी ग्रंथ प्रदर्शन व विक्री (पुस्तकवाले, पुणे) यांचा स्टॉल भिलवडी शिक्षण संस्थेचे बाबासाहेब चितळे सभागृह भिलवडी मध्ये सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत असणार आहे. त्याच दिवशी अनुक्रमे कवठेएकंद, सांगली व सार्वजनिक वाचनालय भिलवडी येथे पार पडलेल्या अभिवाचन स्पर्धेची प्राथमिक फेरीतून निवडलेल्या विजेत्यांची अंतिम फेरी सकाळी १० वाजता स्थळ सार्वजनिक वाचनालय भिलवडी येथे होणार आहे.
दुपारी ३ वाजता जेष्ठ संपादक व विचारवंत डॉ. उदय निगुडकर यांचे भारत @ २०४७ या विषयावर भिलवडी शिक्षण संस्थेत व्याख्यान होणार आहे. तसेच ५ वाजता वाचन कट्टा या उपक्रमांतर्गत सार्वजनिक वाचनालय भिलवडी येथे ५ वजता मी वाचलेले पुस्तक श्यामची आई यावर चर्चासत्राचे आयोजन केले अाहे. गुरुवार दिनांक ८ फेब्रुवारी सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत चितळे डेअरी मध्ये भिलवडी स्टेशन येथे ग्रंथप्रदर्शन होणार आहे. सकाळी ११ वाजता स्व. काकासाहेब चितळे यांच्या प्रतिमेस अभिवादनाचा कार्यक्रम सार्वजनिक वाचनालय भिलवडी मध्ये संपन्न होणार आहे. तसेच सायंकाळी ४ वाजता महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष मिलिंद जोशी यांचे व्याख्यान सार्वजनिक वाचनालय भिलवडी मध्ये संपन्न होणार आहे. याचवेळी वाचन चळवळी विशेष उल्लेखनीय कार्य करीत असलेल्या महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे शाखा आटपाडी, संवादिनी वाचन ग्रुप सांगली, अक्षर सखी पुस्तक भिशी मंडळ तासगाव य संस्थांचा कौतुक सोहळा संपन्न होणार आहे. तरी या सर्व कार्यक्रमात सहभागी होऊन वाचन चळवळ वृद्धिंगत करावी असे आवाहन वाचनालयाचे अध्यक्ष उद्योजक गिरीश चितळे व कार्यवाह सुभाष कवडे यांनी केले आहे.
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆