=====================================
=====================================
पलूस/नागठाणे : वार्ताहर
शनिवार दिनांक 3 फेब्रुवारी 2024 रोजी सन्मान शिक्षण संस्था सुखवाडी संचलित आदर्श प्राथमिक शाळा नागठाणे येथे आद्य क्रांतिवीर राजे नरवीर उमाजी नाईक यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली.
शाळेचे सल्लागार मंडळाचे अध्यक्ष तसेच भारतीय जनता पार्टी भटक्या जाती विमुक्त जमाती आघाडीचे प्रदेश सचिव मा. जयवंत मदने कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. यावेळी जयवंत मदने म्हणाले की,देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी अनेक थोर महापुरुषांनी जाती धर्माच्या पलीकडे जाऊन काम केले. देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी आपल्या प्राण्यांचे बलिदान दिले. या कार्यात आद्य क्रांतिकारक राजे नरवीर उमाजी नाईक यांचा सिंहाचा वाटा होता. देशप्रेम,देशसेवा यांचे मूर्तीमंत उदाहरण म्हणजे नरवीर राजे उमाजी नाईक. त्यांचे चरित्र सर्वांसाठी प्रेरणादायी असेच आहे. इंग्रजांनी उमाजी नाईकांच्या दोन सैनिकांना पकडून त्यांचे मुंडके कापले होते. त्यामुळे जशाच तसे उत्तर देण्यासाठी उमाजी नाईक यांनी इंग्रजांच्या अधिकाऱ्यांचे मुंडके कापून त्यांनी त्याबरोबर खलिता पाठवला. 'त्यात आमच्याशी मित्रत्वाशी वागा नाहीतर त्याचे परिणाम काय होतील' हे त्यांनी दाखवून दिले होते.
यावेळी अभिजीत जठार यांनी देखील आपले मनोगत व्यक्त केले.
प्रारंभी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले. मुख्याध्यापक सुनील मोरे सर यांनी प्रास्ताविक व स्वागत केले. केशव गायकवाड सर यांनी आभार मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रागिणी धनवडे मॅडम यांनी केले. यावेळी स्नेहल पाटील मॅडम, राजनंदिनी माने मॅडम उपस्थित होत्या.
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆