सांगली, दि. 26 (जि. मा. का.) : येत्या सात मे रोजी लोकशाहीचा उत्सव पार पडत आहे. या उत्सवामध्ये सर्वांनी सहभागी व्हावे यासाठी स्वीप मोहिमेअंतर्गत मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी प्रशासन कसोशीने प्रयत्न करीत आहे.
त्या प्रयत्नाचे फलित म्हणून जिल्ह्यात ठिकठिकाणी वेगवेगळ्या उपक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे. या मोहिमेचा उद्देश मतदानाची टक्केवारी वाढावी असा असून या उपक्रमांतर्गत जिल्ह्यातील सर्व तालुक्यांसह सांगली शहरामध्ये दि. 27 मार्च रोजी सकाळी 7 वाजता सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे.
या रॅलीला विश्रामबाग येथून प्रारंभ होणार असून कर्मवीर भाऊराव पाटील चौक, राममंदीर या ठिकाणा वरून मार्गक्रमण करत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्टेडियम येथे या रॅलीची सांगता होणार आहे. या रॅलीला प्रशासनातील सर्व प्रमुख अधिकारी उपस्थित राहणार आहेत. 18 वर्षापुढील सर्वांनी या सायकल रॅलीत सहभागी व्हावे, असे आवाहन स्वीपचे नोडल अधिकारी शशिकांत शिंदे यांनी केले आहे.
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆