yuva MAharashtra सांगली मिरज कुपवाड मनपाकडून अनेक खोकी जमीनदोस्त..

सांगली मिरज कुपवाड मनपाकडून अनेक खोकी जमीनदोस्त..



                                  VIDEO
                                       👇



=====================================
=====================================

सांगली  : (दि.1 मार्च 2024) 

सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका कडून आज शुक्रवार दि. १ मार्च २०२४ रोजी अनेक बेकायदेशीर खोकी जमीनदोस्त करण्यात आली.

  अतिक्रमण विभागाने आज  जोरात कारवाई केली, शहरातील महालक्ष्मी मंदिर शेजारी कुपवाडकडे जाणाऱ्या रस्त्यालगत विना परवाना, बेकायदेशीर असणारे अनेक खोकी आज तोडलेली आहेत.


 अतिक्रमण पथक दिलीप घोरपडे आणि त्यांच्या टीमनी ही कारवाई केली. आयुक्त तथा प्रशासक सुनील पवार यांच्या मार्गदर्शनाखाली व उपआयुक्त वैभव साबळे यांच्या नियंत्रणाखाली सदरची मोहीम राबविण्यात आली.

◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆