कुंडल दि.24 : तारळी धरणातून कोपर्डे लिंक कॅनॉलमध्ये १२ वर्षांच्या अथक प्रयत्नांतून पाणी सोडले गेले खरे पण ते आरक्षित पाणी नियमाप्रमाणे सोडण्यात यावे असे आदेश आमदार अरुणअण्णा लाड यांनी पाटबंधारे विभागाला दिले.
आरफळ योजनेच्या तारळी धारणावरील केवळ १०० मीटर पाईपलाईनचे काम गेली चार वर्षापासून रखडलेले होते ते आमदार लाड यांच्या प्रयत्नांतून पूर्णत्वास आले त्या कामाची पाहणी करण्यासाठी गेले असता अधिकाऱ्यांशी बोलत होते.
आमदार लाड म्हणाले, आजवर कण्हेर धरणातून आरफळ योजनेला पाणी दिले जात होते, हे पाणी सातारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांची भूक भागल्यावरच सांगली जिल्ह्याला दिले जात होते पण या लिंकद्वारे आता आवश्यकतेनुसार व गरजेच्यावेळी सांगली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पाणी मिळणार आहे.
तारळी धरण सहा टीएमसीचे आहे पण त्याला गळती असून त्यातून जवळपास वर्षाकाठी दीड ते दोन टीएमसी पाण्याची गळती होते आणि सध्या धरणात केवळ दीड ते दोन टीएमसी पाणी असल्याने यावर कायमस्वरूपी मार्ग काढून, या पाण्याचा गरजेनुसार वापर करता येण्यासाठी धरणाची गळती काढणे गरजेचे आहे यासाठी शासकीय स्थरावर प्रयत्न करणार असल्याचे ही त्यांनी सांगितले.
आरफळ योजना ही सांगली जिल्ह्यातील वांगी, रामपूर, बलवडी, कुंडल, आंधळी, बाबवडे, सांडगेवादी, येळावी, मोराळे, राजापूर, तुरची पोलीस प्रशिक्षण केंद्राजवळील तळ्यात जाते तर तासगाव तालुक्यातील बहुतांश गावात ही हे पाणी जाऊन हजारो हेक्टर शेती ओलिताखाली येते. इथून पुढे या भागातील शेतकऱ्यांना गरजेच्या वेळी पाणी मिळाल्याने शेतकरी आणि शेती सुसह्य होणार आहे.
कामाची पाहणी सातारा जिल्हा इरिगेशन फेडरेशनचे रत्नाकर तांबे, श्रीकांत लाड, क्रांतीचे उपाध्यक्ष दिगंबर पाटील, अशोक पवार, बांबवडेचे सरपंच पांडुरंग संकपाळ, दिनकर लाड, क्रांतीचे संचालक संग्राम जाधव, ऍड. सतीश चौगुले, कुंडलिक एडके यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी केली.
कृष्णा कालव्यात पाणी सोडण्यासाठीची कागदोपत्री पूर्तता पूर्ण झाली आहे येत्या काही दिवसात ते ही पाणी सोडले जाईल.... आमदार अरुण लाड.
तारळी धरणातून कोपर्डे लिंक कॅनॉलद्वारे आरफळ कॅनॉलमध्ये पाणी सोडले याची पाहणी करताना आमदार अरुण लाड, दिगंबर पाटील, पांडुरंग संकपाळ, श्रीकांत लाड आदी.
हेही पहा ----
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆