लालासाहेब बाबर यांच्या पुण्यस्मरणनिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन
======================================
======================================
सांगोला/सोनंद : वार्ताहर दि. १५ मार्च २०२४
सोनंद येथील माजी सरपंच कै.डॉ.लालासाहेब बाबर व माजी ग्रा.पंचायत सदस्या कै. पद्मिनी लालासाहेब बाबर यांच्या पुण्यस्मरण दिनानिमित्त रविवार दिनांक 17 मार्च 2024 रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे.
यामध्ये पटोदा( छत्रपती संभाजीनगर) या भारतातील आदर्श गाव म्हणून गणले गेलेल्या गावचे माजी सरपंच व प्रसिद्ध व्याख्याते भास्करराव पेरे पाटील यांच्या व्याख्यानाचा कार्यक्रम आयोजित केला आहे.हा कार्यक्रम केंद्रीय आश्रम शाळा सोनंदच्या पटांगणावर सकाळी दहा वाजता आयोजित केला असून या कार्यक्रमास सर्वांनी उपस्थित राहण्याचे आवाहन लालासाहेब बाबर यांचे सुपुत्र जगदीश बाबर व महेश बाबर यांनी केले आहे.
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆