yuva MAharashtra नागपूर येथील बांधकाम कामगाराच्या मृत्यूस कारणीभूत संयोजक तसेच विभागीय कामगार आयुक्त, शासकीय अधिकारी यांचेवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा..

नागपूर येथील बांधकाम कामगाराच्या मृत्यूस कारणीभूत संयोजक तसेच विभागीय कामगार आयुक्त, शासकीय अधिकारी यांचेवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा..


वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियन महाराष्ट्र राज्य सांगली यांचे, सहाय्यक कामगार आयुक्त यांना निवेदन.
        
                                VIDEO



=====================================
=====================================

सांगली : वार्ताहर           दि.११ मार्च २०२४

आदरणीय ॲड प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांच्या वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियन महाराष्ट्र राज्य सांगली जिल्हा यांच्या मार्फत नागपूर येथे घडलेल्या दुर्दैवी घटनेचा तीव्र शब्दांत निषेध व्यक्त करून, सहाय्यक कामगार आयुक्त, सांगली यांना निवेदन देण्यात आले. निवेदन द्वारे असे म्हटले आहे की, संपूर्ण महाराष्ट्रात सांगली जिल्हासह, नागपूर  शहरात भाजप राजकीय पक्षाने होऊ घातलेल्या निवडणुकीत मतांचा फायदा लक्षात घेऊन लोकांची मते आपल्या पक्षाकडे वळविण्यासाठी लोकांना संसार उपयोगी भांडी संच देण्याचे आमिष दाखवून मोठ्या प्रमाणावर गर्दी केली ८ मार्च ते १५ मार्च  दरम्यान भाजपा पक्षाचे व आपल्या फायद्यासाठी महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाचा वापर करून व यंत्रणा हाताशी धरून नोंदणीकृत बांधकाम कामगारांना संसार उपयोगी भांडी संच तसेच सुरक्षा संच व त्यावर संस्थेचे वाटप शिबिर घेतले होते. परंतु सदरच्या योजना ह्या दोन ते तीन वर्षांपूर्वीच मान्यता मिळाली असून केवळ होऊ घातलेल्या राजकीय निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर लोकांची गर्दी करून मतदारांची दिशाभूल करण्यासाठी योजना सुरू करून कामगारांची आर्थिक, मानसिक, सामाजिक संतुलन बिघडण्याचे काम भाजप सरकारने केले आहे. या भाजप प्रणित बांधकाम कामगार मंडळाचा वापर करून उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच भाजप पक्षाचे प्रदेशध्यक्ष चंद्रकांत बावनकुळे यांच्या प्रमुख उपस्थितीत नागपूर येथील 'सुरेश भट सभागृह' मध्ये कार्यक्रम घेण्यात आला होता. यावेळी मोठ्या प्रमाणात लोकांची गर्दी करून वातावरण निर्मिती करण्याचा प्रयत्न केला होता, सदर ठिकाणी येणाऱ्या कामगारांसाठी कोणतेही सुविधा व  सुरक्षिततेची काळजी घेतली गेली नव्हती तसेच कोणतेही नियोजन केले गेल्याचे  दिसून आले नसल्याने भर उन्हात कामगारांची तारांबळ उडाली व मोठ्या प्रमाणात गर्दीत झाल्याने गोंधळ निर्माण झाला. गोंधळात धक्काबुक्की, चेंगराचेंगरीने अनेक महिला व मुले जखमी झाले. तसेच बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाचे सचिव तथा मुख्य कार्यकारी अधिकारी आणि विभागीय कामगार आयुक्त यांच्या ढिसाळ नियोजनामुळे महिला बांधकाम कामगार  मनुबाई तुळशीराम रजपूत, (रा. नागपूर) यांचा मृत्यू झाला आहे. या गंभीर बाबीला भाजप पक्षांचे राजकीय संयोजकांच्या बरोबरच शासकीय यंत्रणा म्हणजे कल्याणकारी मंडळचे सचिव तथा मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच विभागीय कामगार आयुक्त आणि सहाय्यक कामगार आयुक्त हे जबाबदार आहेत. या सर्वांनी घटना ठिकाणाहून पळ काढला तसेच सदर ठिकाण चे पुरावे नष्ट केले आहेत. हे स्थानिक दैनिकातून वृत्तवाहिनीवर प्रसिद्ध झाले आहे. तसेच त्यामुळे बांधकाम कामगाराच्या मृत्यूस कारणीभूत ठरणारे आयोजकांच्या तसेच विभागीय कामगार आयुक्त, सहाय्यक कामगार आयुक्त आणि जबाबदार इतर शासकीय अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा ताबडतोब दाखल करा आणि मृत्यू झालेल्या बांधकाम कामगारांच्या वारसांना ५० लाख रुपये तसेच जखमी झालेल्या बांधकाम कामगारांना २५ लाख रुपये
नुकसानभरपाई त्वरित देणेत यावेत. अन्यथा बांधकाम कामगारांच्या न्याय हक्कासाठी कामगार मंत्री सुरेश खाडे यांच्या शासकीय कार्यालयाच्या आवारात तसेच बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाचे सचिव तथा मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक कुंभार यांच्या दालनात लोकशाही मार्गाने उपोषणाला बसावे लागेल असा इशारा देण्यात आला आहे. 


यावेळी, वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियन महाराष्ट्र राज्य सांगली जिल्हाध्यक्ष संजय संपत कांबळे, महासचिव अनिल मोरे सर, कार्याध्यक्ष जगदिश कांबळे, संपर्कप्रमुख संजय भूपाल कांबळे, संगाप्पा शिंदे, दादासो सदाकळे, सागर आठवले, विठ्ठल पाटील, हणमंत पाटील, सचिन कट्यप्पा, माणिक कालेकर, चंद्रकांत कालेकर, राजेंद्र कांबळे, दिपक खांडेकर यांच्या सहित नोंदणीत बांधकाम कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

हेही पहा ----



◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆
Tags