yuva MAharashtra दुकान फोडी करणाऱ्या चोरट्याला अटक ; भिलवडी पोलिसांची कामगिरी

दुकान फोडी करणाऱ्या चोरट्याला अटक ; भिलवडी पोलिसांची कामगिरी

 
======================================
======================================

भिलवडी : वार्ताहर                  दि. 24 मार्च 2024

पलूस तालुक्यातील भिलवडी पोलीस ठाणे हद्दीत दुकान फोडी करणाऱ्या चोरट्याला पकडण्यात भिलवडी पोलिसांना यश..
  
सलीम रमजान वालेकर रा.नागठाणे ता. पलूस जि. सांगली मुळ रा. रा.इंचकेरी मठ  जि. विजापूर असे अटक केलेल्या आरोपीचे नांव असून त्याच्या ताब्यातील
चोरी केलेला १२९६०/-  रुपये  किंमतीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. 

  भिलवडी पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार प्रविण प्रकाश पवार रा.शिरगाव ता.वाळवा जि.सांगली यांचे स्वताच्या मालकीचे पलूस तालुक्यातील नागठाणे येथे गणेशनगर कडे जाणाऱ्या रोडवरती देसाई सर्व्हिसिंग सेंटर शेजारी असणाऱ्या श्री सिध्देश्वर कृषी सेवा केंद्र या दुकानाच्या पाठीमागील बाजूचा पत्रा चकवून दुकानात प्रवेश करून शेतीउपयोगी असणारे खते,औषधांची चोरी झाली असल्याची फिर्याद भिलवडी पोलीस ठाण्यात दि.22 मार्च रोजी दिली होती.सदरची घटना 18 मार्च रोजी रात्री 8:00 वा. ते 19 मार्च रोजी सकाळी 8:00 वा. दरम्यान घडली होती.
   फिर्यादीच्या तक्रारीवरून सदर गुन्ह्याचा तपास सुरु असताना    
नागठाणे येथील सलीम रमजान वालेकर या व्यक्तीने हा गुन्हा केल्याची गोपनीय माहिती साहा. पोलीस निरीक्षक नितीन सावंत व पो.काँ. विशाल पांगे यांना मिळाली. गोपनीय बातमीदाराच्या माहितीवरून पोलीसांनी सलीम रमजान बालेकर याला दि.22 मार्च रोजी ताब्यात घेऊन त्याची कसून चौकशी केली असता हा गुन्हा व यापूर्वी भिलवडी पोलीस ठाण्यात दाखल असलेला गुरनं १५/२०२३ भादविसक ३७९ या गुन्हयाची देखील त्यांने कबुली दिली आहे.
  चोरीस गेलेले किटकनाशक, तननाशक व खताच्या बॅगा (रुपये १२९६०/-) किंमतीचा मालमत्ता जप्त करुन आरोपीला अटक करण्यात आली आहे.


सदरची कारवाई सहा. पोलीस निरीक्षक नितीन सावंत , पोहेकाँ.अरविंद कोळी , पोहेकाँ. महेश घस्ते , पोहेकाँ. प्रविण सुतार ,  पोकाँ. विशाल पांगे , पोकाँ सोहेल शेख , पोकाँ.स्वप्नील शिंदे ,  पोकाँ मंगेश गुरव , सायबर पोलीस ठाणे पोकाँ अजय पाटील यांनी केली असून पुढील तपास हवालदार कोळी करीत आहेत.

हेही पहा ----






◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆