======================================
======================================
विटा प्रतिनिधी : दि. ३ मार्च २०२४
घाटमाथ्याचे नेते राजाभाऊ शिंदे,अनिल शिंदे यांनी खानापूर प्राथमिक आरोग्य केंद्र येथे ट्रामाकेअर सेंटर स्थापन करण्याबाबत माननीय आमदार अनिल भाऊ यांच्याकडे मागणी केली होती. भाऊंच्या निधनानंतर या कामाचा पाठपुरावा युवा नेते सुहास बाबर यांनी केला. त्यांनी राज्याचे मुख्यमंत्री मा एकनाथ राव शिंदे साहेब यांच्याशी पत्रव्यवहार करून त्याबाबत मागणी केली होती व ती लवकर मंजूर व्हावी यासाठी प्रयत्न केले होते त्यास यश येऊन प्राथमिक आरोग्य केन्द्र खानापूर येथे ट्रामाकेअर सेंटर स्थापन करणे करणेबाबतचा प्रस्ताव मा. संचालक आरोग्य सेवा संचालनालय मुंबई यांचे कडे मंजूरी करीता पाठविण्यात अला आहे असे सुहास बाबर यांनी सांगितलेयावेळी बोलताना बाबर म्हणाले खानापूर येथे
प्राथमिक आरोग्य केंद्र आहे व खानापूर हे गाव राष्ट्रीय महामार्गावरील प्रमुख शहर आहे व याच्या आसपास बरीच छोटी गावे व वस्त्या आहेत तेथील लोकांना मुख्य बाजारपेठ ही खानापूर आहे व मुले व मुली यांना शाळा व कॉलेज साठी खानापूर या ठिकाणीच यावे लागते सततच्या रहदारी मुळे व या गावच्या मध्यभागातूनच विजापूर गुहागर हा राष्ट्रीय महामार्ग गेल्यामुळे वारंवार होणारे अपघात, व त्यानंतर रुग्णांना तत्काळ आरोग्य सेवा मिळण्यासाठी, विटा किंवा तासगाव याठिकाणी जावे लागत होते ,हा सर्व त्रास बंद होणेसाठी व खानापूर ची वाढती लोकसंख्या, व उपलब्ध आरोग्य सेवा सुविधा इ. बाबी विचारात घेता प्रा. आ. केंद्र खानापूर येथे नविन ट्रामाकेअर सेंटर करणे आवश्यक आहे.यासंदर्भात मुख्यमंत्री यांनी तात्काळ प्रस्ताव मंजूर करण्याचे आश्वासन दिले असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆