=====================================
=====================================
भिलवडी : वार्ताहर दि. ५ मार्च २०२४
नुकत्याच झालेल्या जागतिक कर्करोग दिनानिमित्त ग्रामपंचायत वसगडे ता.पलुस येथे भारती विद्यापीठ दंत महाविद्यालय आणि रुग्णालय सांगली या शाखेने विशेष दंत शिबिराचे आयोजन केले होते. समाजामध्ये या शिबिराच्या माध्यमातून कर्करोगाची जनजागृती व्हावी या उद्देशाने या शिबिराचे आयोजन करण्यात आले. शिबिरामध्ये एकूण १०० रुग्णांची तपासणी करण्यात आली.
वसगडे सरपंच वृषाली काशीद, उपसरपंच अनिल पाटील तसेच पं.स.सदस्य अमोल पाटील, ओरल सर्जरी विभागप्रमुख डॉ.संजय बायकोडी, डॉ.हर्षवर्धन कदम उपस्थित होते.
आयोजन दंत महाविद्यालयाचे सर्जन डॉ.अमित बसन्नावर यांनी केले.
या शिबिरासाठी भारती विद्यापीठाचे मानद संचालक एच.एम.कदम व प्राचार्य डॉ.शरद कामत यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
हेही पहा ----
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆