yuva MAharashtra सांगली लोकसभा जागा ही काँग्रेस लढवनारच.. डॉ.सुशील गोतपागर

सांगली लोकसभा जागा ही काँग्रेस लढवनारच.. डॉ.सुशील गोतपागर




सांगली दि.24 : सांगली लोकसभा ही काँग्रेसची पारंपारिक  जागा असून  ,काँग्रेस ची मोठी ताकद आहे .सुमारे  4 ते 5 लाख मते या मतदार संघात काँग्रेस विचाराची हक्काची आहेत.सांगली लोकसभा ही काँग्रेसचे नेत्या सोबत  प्रत्येक कार्यकर्त्याची सुद्धा प्रतिष्ठेचा विषय झाला आहे. त्यासाठी जिल्ह्यातील नेते डॉ.विश्वजीत कदम साहेब,यांचे नेतृत्वाखाली विशाल दादा पाटील यांनी ही निवडणूक लढवावी म्हणून  सांगली जिल्हा युवक काँग्रेसच्या वतीने डॉ.विश्वजीत कदम साहेब, मा. विशाल दादा पाटील, जिल्हाध्यक्ष आ.विक्रम दादा  सावंत, मा.जयश्री वहिनी पाटील , मा.पृथ्वीराज पाटील साहेब यांना आग्रहाची विनंती करण्यात  आली आहे. काहीही झाले तरी विशाल दादा पाटील यांचे माध्यमातून काँग्रेस ने लोकसभा लढवावी यावर  जिल्ह्यातील सर्व काँग्रेस  कार्यकर्ते ठाम आहेत.सांगली ही काँग्रेस ची विनिंग सीट आहे. सांगली लोकसभा  विजयासाठी काँग्रेस  नेत्यांच्या सोबत कार्यकर्त्यांनी ही खूप तयारी केली आहे.महाविकास आघाडीतून विशाल दादा पाटील यांना तिकीट मिळावं ही सर्वाची इच्छा आहे. असे नाही झाले तर काँग्रेस ने  मैत्रीपूर्ण लढत द्यावी.तिरंगी लढत झाली तरीसुद्धा यावेळी काँग्रेस उमेदवार विशाल दादा पाटील हे  नक्की निवडून येतील .यावेळी लोकशाही व संविधान वाचण्यासाठी ,भाजपा हटवण्यासाठी सांगली जिल्ह्यात वंचित बहुजन आघाडीही काँग्रेस बाबत अनुकूल आहे. त्यामुळे ही जागा काँग्रेस लढणार आणि जिंकनार सुद्धा.
महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष मा.कुणाल दादा राऊत यांनाही रामटेक लोकसभा मतदार संघातून उमेदवारी मिळणे अपेक्षित होते.रामटेक मध्ये युवक काँग्रेसचे माध्यमातून कुणाल दादा राऊत नी खूप बांधणी केली होती. काँग्रेस ने युवकांना संधी द्यायला पाहिजे.कुणाला दादा राऊत यांना  उमेदवारी न दिल्यामुळे युवक काँग्रेस मध्ये नाराजी आहे.यामुळे तरुणांचे खाच्चिकरण होते.परंतु सध्या लोकशाही आणि संविधान वाचवण्यासाठी युवक काँग्रेस पक्षाचा आणी नेत्यांचा आदेश प्रमाण मानून ताकदीने काम करेल..

हेही पहा ----




◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆