पार्थ कॅन्सर फाउंडेशन प्रथम वर्धापन दिन साजरा
======================================
======================================
सांगोला (ता.३ मार्च २०२४) : हात आपुलकीचा;अंत करू कर्करोगाचा या उद्देशाने व पार्थ केदार यांच्या स्मरणार्थ स्थापन केलेल्या 'पार्थ कॅन्सर फाउंडेशन' या सामाजिक संस्थेचा प्रथम वर्धापन दिन संस्थेचे मुख्य आधारस्तंभ पोपट केदार व महादेव बाबर यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाला. यावेळी रेवनील ब्लड बँक सांगोला यांच्या सहकार्याने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.यास उत्तम प्रतिसाद लाभला.
याप्रसंगी संस्थेच्या संस्थापक अध्यक्षा शुभांगी केदार यांनी आपली संस्था सर्वसामान्य कुटुंबातील कॅन्सर रुग्णांच्या सदैव पाठीशी तत्पर असून आतापर्यंत 16 रुग्णांना संस्थेने त्याच्या आवश्यकतेनुसार सर्व मदत केली आहे. यामध्ये मुंबई, पुणे येथून महागड्या औषधांचा पुरवठा केला,उपचारासाठी वेगवेगळ्या शहरांना भेटी देताना निवास, प्रवास आणि भोजन यासाठी मदत केली,रुग्णाला इतर डॉक्टरांकडून दुसरा सल्ला घेण्यास मदत केली,कुटुंबांना आवश्यक भावनिक आणि मानसिक आधार दिला,खूप सवलतीच्या दरात महागडे चेकअप प्रदान केले,तज्ञांच्या मदतीने आवश्यक महत्वाची माहिती वेळेवर दिल्याचे सांगितले.उपाध्यक्ष संजय केदार मनोगतात म्हटले आमच्या संस्थेने याशिवाय अनेक सामाजिक उपक्रम राबविले यामध्ये आमच्या हितचिंतकांकडून वृक्षारोपण,विशेष कार्यक्रम आणि प्रसंगांना उपस्थित राहून उदात्त हेतूबद्दल जागरूकता पसरवली,आरोग्य सुधारण्यासाठी सामाजिक उपक्रमांना प्रोत्साहन दिले,मूकबधिर शाळेतील मुलांना व्हॉलीबॉल किट प्रदान केले.
सामाजिक महत्त्व असलेल्या विविध विषयांवर टॉक शो आयोजित केले,कर्करोग प्रतिबंधासाठी आरोग्य तपासणी मोहीम आयोजित करण्याचा प्रयत्न केला याशिवाय स्थानिक आमदार मा शाहजी बापू पाटील यांना पत्र देऊन भविष्यात रुग्णांच्या सेवेसाठी रुग्णवाहिकेची पूर्तता करण्यासाठी प्रयत्न केले.संस्था सचिव हर्षद बाबर यांनी कार्याचा आढावा घेताना म्हटले.आजपर्यंत,100 हून अधिक लोकांनी संस्थेला त्याच्या उदात्त हेतूसाठी पाठिंबा देऊन आर्थिक मदतीचा हात दिलाआहे,अनेक डॉक्टरांनी रुग्णांना मदत केली,अनेक आरोग्य तपासणी केंद्रांनी रुग्णांना सवलतीच्या दरात चाचण्या करून मदत केली,फार्मसी किरकोळ विक्रेते आणि वितरकांनी रुग्णांना महत्त्वाची औषधे वेळेवर मिळण्यास मदत केली,संस्था आणि हितचिंतकांनी त्यांच्या कौशल्याने आणि अनुभवातून संस्थेला पाठिंबा दिला.
सहसचिव सुशांत बाबर खजिनदार अमित केदार, संचालक अतिश लिगाडे यांनी डिजिटल विभागाचे काम व प्रशांत बाबर यांनी रुग्णांना भेटी देऊन मार्गदर्शन करण्याचे काम यशस्वीरीत्या पूर्ण केले. पोपट केदार ,महादेव बाबर,ललिता लिगाडे यांनी आर्थिक पाठबळ उभे करण्यासाठी प्रमुख भूमिका बजावली.औषध रुग्णांपर्यंत पोहोच करण्यासाठी सहकार्य करणारे रोहित माने,युवराज केदार,संतोष केदार यांचा सन्मान करण्यात आला.
यावेळी डॉ. ढोबळे यांनी सदिच्छा भेट देऊन मार्गदर्शन केले,मनीषा मोरे,दिगंबर साळुंखे,कुंडलिक अलदर यांनी आपले मनोगत व्यक्त करून संस्थेला शुभेच्छा दिल्या.या कार्यक्रमास संस्थेचे सर्व हितचिंतन,सभासद,रुग्ण,रुग्णांचे पालक व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆