yuva MAharashtra हॉकी, ॲथलेटीक्स, व्हॉलीबॉल खेळाचे उन्हाळी क्रीडा प्रशिक्षण शिबीर 16 ते 25 एप्रिल कालावधीत

हॉकी, ॲथलेटीक्स, व्हॉलीबॉल खेळाचे उन्हाळी क्रीडा प्रशिक्षण शिबीर 16 ते 25 एप्रिल कालावधीत




सांगली, दि. 3, (जि. मा. का.)  : क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा ‍अधिकारी कार्यालय, सांगली तथा जिल्हा क्रीडा परिषद, सांगली यांच्यावतीने हॉकी, ॲथलेटीक्स, व्हॉलीबॉल या खेळाच्या उन्हाळी क्रीडा प्रशिक्षण शिबीराचे आयोजन  दि. 16 ते 25 एप्रिल 2024 या कालावधीत करण्यात आलेले आहे. अशी माहिती  जिल्हा क्रीडा अधकारी किरण बोरवडेकर यांनी दिली.


 प्रशिक्षण शिबीर 8 ते 20 वयोगटासाठी दि. 16 ते 25 एप्रिल 2024 या कालावधीत आयोजित करण्यात आले आहे. ॲथलेटीक्स खेळाचे प्रशिक्षण तालुका क्रीडा संकुल तासगाव येथे व हॉकी खेळाचे प्रशिक्षण तालुका क्रीडा संकुल मिरज येथे सकाळी 7 ते 9 वाजेपर्यंत व सायंकाळी 4 ते 7 या वेळेत आयोजित करण्यात आले आहे. व्हॉलीबॉल खेळाचे प्रशिक्षण मॉडर्न हायस्कूल साखराळे ता. वाळवा येथे  सकाळी 7 ते 9 वाजेपर्यंत व सायंकाळी 5 ते 8 या वेळेत आयोजित केले आहे. 

 उन्हाळी क्रीडा प्रशिक्षण ‍शिबीरामध्ये सहभागी होण्यासाठी  जिल्हा ‍ क्रीडा ‍अधिकारी कार्यालय, सांगली येथे श्री जमीर अत्तार, श्रीमती आरती हळींगळी व श्रीमती सीमा पाटील, क्रीडा मार्गदर्शक यांच्याशी संपर्क करावा, असे श्री. बोरवडेकर यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे कळविले आहे.
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆