yuva MAharashtra क्रांतिअग्रणी डॉ.जी.डी.बापू लाड सहकारी साखर कारखान्‍याचा गळीत हंगाम 2024-25 च्‍या तोडणी-वाहतूक करारांचा शुभारंभ...

क्रांतिअग्रणी डॉ.जी.डी.बापू लाड सहकारी साखर कारखान्‍याचा गळीत हंगाम 2024-25 च्‍या तोडणी-वाहतूक करारांचा शुभारंभ...

 
पलूस/कुंडलः वार्ताहर      दि. १२ एप्रिल २०२४

पलूस / कुंडल येथील क्रांतिअग्रणी डॉ.जी.डी.बापू लाड सहकारी साखर कारखान्‍याचा गळीत हंगाम 2024-25 च्‍या तोडणी-वाहतूक करारांचा शुभारंभ कार्यक्रम कारखान्‍याचे मार्गदर्शक आमदार अरुणअण्‍णा लाड व अध्यक्ष शरद लाड यांचे हस्‍ते पार पडला.


यावेळी अरुणअण्‍णा लाड म्‍हणाले, पुढील गाळप हंगामाचे 14 लाख मे.टन ऊस गाळपाचे उद्दिष्‍ट ठेवले आहे. तरी सर्व वाहतून कंत्राटदारांनी करार लवकरात लवकर पुर्ण करुन चांगल्‍या प्रतिचा ऊस गाळपास आणावा कि जेणे करुन कारखान्याचा त्‍याअनुशंगाने शेतक-यांचाही फायदा साधता येईल. बँकेने साखरेचे मुल्‍यांकन कमी केल्‍यामूळे कारखाने शॅार्ट मार्जीन मध्‍ये जात आहेत. आपण यावर्षी एफआरपी करिता 3100 बील दिले आहे. शासन साखर कारखानदारी बाबत उदासीन आहे. तसेच यत्रणा चांगली भरावी त्यामुळे ऊस गाळपास जास्त उपलब्ध होईल आपण ऊस तोंड मजूरा करिता मोफत आरोग्य सेवा देतोय त्याच्या मुलामुलींसाठीही करिता साखर शाळा चालवतोय त्याच्या आरोग्याच्या दुष्टीने शुध्द पिणाच्या पाण्याची सोय उपलब्ध करून देतो तसेच त्याच्या करिता बंदिस्त शौचालय उपलब्ध केली आहेत .यंदा जास्त पाऊस ची अपेक्षा त्यामुळे ऊस क्षेत्र याही वर्षी जास्‍त होईल त्‍यामूळे कदाचीत कारखाना लवकर चालू करावा लागेल त्‍या दृष्‍टीने सर्वांनी तयारीला लागले पाहिजे यावेळी कारखान्याचे अध्यक्ष शरद लाड म्हणाले महाराष्ट्रात प्रथम क्रांती कारखान्याने तोडणी वाहतूक दर १५ टक्केनी वाढ दिली त्याच बरोबर शासना ने जाहीर केल्या प्रमाणे ३४ टक्के मधील फरक ही तोडणी वाहतूकदाराना दिला आहे. तोडणी मजूराची बिले वेळच्यावेळी दर पंधरवड्याला अदा केली जातात.

 कारखान्याने यंदा 1092000 ऊस गाळप करुन क्रांती अघाडी वरती राहिला आहे. येणाऱ्या हंगामात 14 लाख मे.टन गाळपाचे उदिष्ट निश्चित केले असून या करिता प्रति दिन गाळप क्षमता 7500 वरून प्रति दिन गाळप क्षमता 10000 करण्या करिता लागणाऱ्या मिशमनरी बसवण्याचे काम चालू केले आहे. यामुळे शेतकर्याचा ऊस वेळेत जाण्या करिता नक्कीच फायदा होईल व कमी वेळेत जास्तीत जास्त गाळप होईल. 

कारखाना शेती कर्मचारी यांनी शेतकरी याच्याशी चांगले संबंध ठेवून त्याच्या शंकेचे निरासण वेळच्यावेळी करणे आवश्यक त्यामुळे कारखान्याची प्रतिमा आणखी चांगली होईल तोडणी वाहतूकदारानी ही ऊसतोड मंजूर ज्यांना खरीच कामांची आवश्यकता असलेले आणले तर शेतकरी याच्या कडून येणाऱ्या तक्रारी चे प्रमाण कमी होईल व त्याचा फायदा कारखान्यास होईल .


प्रथम दिपप्रज्‍वलन करुन तोडणी-वाहतून कंत्राटदारांना कराराचे वाटप करणेत आले. यावेळी क्रांती कुंटूब प्रमुख आमदार अरुणअण्णा लाड, अध्यक्ष शरद लाड, , संचालिका अजंना सुर्यवंशी , अश्विनी पाटील, संचालक जयप्रकाश साळुंखे, अनिल पवार, दिलीप थोरबोले ,अशोक विभूते कार्यकारी संचालक सी.एस.गव्‍हाणे, कारखान्‍याचे सचिव सर्व संचालक, अधिकारी, वाहतूक कंत्राटदार आणि कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे स्‍वागत व प्रास्‍तावीक आभार शेती अधिकारी दिलीप पार्लेकर यांनी केले.


क्रांतिअग्रणी डॉ.जी.डी.बापू लाड सह.साखर कारखान्‍याचा तोडणी-वाहतूक कंत्राटदारांचा करार शुभारंभ करताना मा.आमदार अरुणअण्‍णा लाड. अध्यक्ष शरद लाड व मान्यवर
हेही पहा ---

◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆