yuva MAharashtra 44- सांगली लोकसभा मतदार संघात दूसऱ्या दिवशी दोन उमेदवारांची तीन नामनिर्देशन पत्रे दाखल

44- सांगली लोकसभा मतदार संघात दूसऱ्या दिवशी दोन उमेदवारांची तीन नामनिर्देशन पत्रे दाखल




सांगली दि. 15 (जि.मा.का.) :- लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 साठी 44-सांगली लोकसभा मतदारसंघात आज नामनिर्देशन दाखल करण्याच्या आज दुसऱ्या दिवशी दोन उमेदवारांनी तीन नामनिर्देशनपत्रे दाखल केली.

(1)  विशाल प्रकाशराव पाटील यांनी इंडियन नॅशनल कॉग्रेस पक्षातर्फे एक व अपक्ष म्हणून एक नामनिर्देशनपत्र दाखल केले.


(2)       सतीश  ललिता कृष्णा कदम यांनी हिंदुस्थान जनता पार्टी तर्फे एक नामनिर्देशनपत्र दाखल केले.

नामनिर्देशनपत्र दाखल करण्याच्या आज दुसऱ्या दिवशी 12 व्यक्ती 22 अर्ज घेऊन गेल्या आहेत. लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 अंतर्गत 44-सांगली लोकसभा मतदारसंघासाठी नामनिर्देशनपत्र दाखल करण्याचा अंतिम दिनांक 19 एप्रिल 2024 असा आहे.

हेही पहा ---


https://youtu.be/pbkAi5NEtlM?si=LrPIksJGEiS5lQ3B

◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆