सांगली, दि. 11, (जि. मा. का.) : जिल्हा विधी सेवा प्राधिकरणामार्फत जिल्ह्यात 5 मे 2024 रोजी आयोजित करण्यात आलेली राष्ट्रीय लोक अदालत आता 27 जुलै 2024 रोजी होणार असल्याचे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव प्रविण कि. नरडेले यांनी कळविले आहे.
राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण नवी दिल्ली व राज्य विधी सेवा प्राधिकरण यांच्या निर्देशानुसार रविवार, दि. 5 मे 2024 रोजी लोक अदालत आयोजित करण्याबाबत निर्देशित केले होते. सदस्य सचिव महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण उच्च न्यायालय मुंबई यांचेकडील दि. 8 एप्रिल 2024 च्या पत्रान्वये रविवार दि. 5 मे 2024 रोजी आयोजित करण्यात आलेली राष्ट्रीय लोकअदालत शनिवार दि. 27 जुलै 2024 रोजी आयोजित करण्याबाबत कळविण्यात आले आहे. ज्या पक्षकारांचे दावापूर्व व प्रलंबित प्रकरणे ही दि. 5 मे 2024 रोजीच्या लोकअदालतमध्ये ठेवण्यात आली आहेत, त्यांनी लोकअदालतीच्या तारखेमध्ये बदल झाल्याबाबत नोंद घ्यावी, असे आवाहन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव प्रविण कि. नरडेले यांनी केले आहे.
हेही पहा -----
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆