वसंत मोरे यांना पुण्यातून वंचितची उमेदवारी..
पुणे दि. 2 : पुण्यातून मोठी बातमी समोर आली आहे. वंचित बहुजन आघाडीकडून पुण्यातील उमेदवाराचं नाव जाहीर करण्यात आलं आहे. मनसेला सोडचिठ्ठी देणारे नेते वसंत मोरे यांना वंचितकडून उमेदवारी जाहीर झाली आहे. वसंत मोरे यांनी मनसेला सोडचिठ्ठी दिल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली होती. त्यानंतर त्यांनी काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर यांचीदेखील भेट घेतली होती. पण काँग्रेसकडून पुण्यात रवींद्र धंगेकर यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर वसंत मोरे यांनी वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांची भेट घेतली होती. यानंतर वंसत मोरे वंचितच्या तिकीटावर पुण्यातून निवडणूक लढवणार असल्याची चर्चा रंगली होती. या चर्चांवर रवींद्र धंगेकर यांनी प्रतिक्रिया दिली होती. वसंत मोरे यांनी वंचितच्या तिकीटावर उमेदवारी अर्ज भरला तरी त्यांचं स्वागत असेल, असं धंगेकर काही दिवसांपूर्वी म्हणाले होते. त्यानंतर आज अखेर याबाबतच्या चर्चेवर शिक्कामोर्तब झालं आहे. वसंत मोरे यांना वंचित बहुजन आघाडीकडून पुण्यातून अधिकृत उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆