yuva MAharashtra माध्यमकर्मी व अभ्यासकांसाठी जिल्हा माहिती कार्यालयाकडून पूर्वपीठिका प्रसिद्ध

माध्यमकर्मी व अभ्यासकांसाठी जिल्हा माहिती कार्यालयाकडून पूर्वपीठिका प्रसिद्ध


                      www.thejanshaktinews.in




माध्यमकर्मी व अभ्यासकांसाठी जिल्हा माहिती कार्यालयाकडून पूर्वपीठिका प्रसिद्ध

 

            सांगली, दि. 23, (जि. मा. का.) : सार्वत्रिक लोकसभा निवडणूक-2024 देशभर माहोल सुरु आहे. निवडणुकीत सर्वाधिक लोकशिक्षणाचे कार्य प्रसारमाध्यमाकडून केले जाते. त्यासाठी  जिल्हा निवडणूक कार्यालयाच्या सहकार्याने व जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांच्या सूचनेनुसार जिल्हा माहिती कार्यालय, सांगली  यांच्याकडून सांगली लोकसभा मतदारसंघाच्या पूर्वपीठिकेचे प्रकाशन आज मंगळवार दिनांक 23 एप्रिल रोजी जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी, मनपा आयुक्त शुभम गुप्ता, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे, पोलीस अधिक्षक संदिप घुगे यांच्या हस्ते करण्यात आले.


            यावेळी सहाय्यक जिल्हाधिकारी अमित रंजन, उप मुख्य कार्यकारी अधिकारी (जि.प.) तथा स्वीप नोडल अधिकारी शशिकांत शिंदे, जिल्हा माहिती अधिकारी फारूक बागवान, माहिती अधिकारी एकनाथ पोवार, मनपा जनसंपर्क अधिकारी धनंजय हर्षद हे उपस्थित होते.


        लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 च्या अनुषंगाने माध्यमे तसेच अभ्यासकांसाठी अत्यंत उपयुक्त असलेल्या या पूर्वपीठिकेत सांगली जिल्ह्यातील सन 1951 पासून ते सन 2019 पर्यंत घेण्यात आलेल्या लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीतील विजयी - पराभूत उमेदवार, त्यांना मिळालेले मतदान याबाबतचा सर्वंकष आढावा घेण्यात आला आहे.

        ही पूर्वपीठिका माध्यम प्रतिनिधी तसेच अभ्यासकांना उपयुक्त आहे. या पूर्वपीठिकेत लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 च्या अनुषंगाने जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. राजा दयानिधी यांचे आवाहन पर मनोगत प्रसिद्ध करण्यात आले आहे.

♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️


♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️
♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️