yuva MAharashtra राजकीय पक्ष प्रतिनिधींच्या उपस्थितीत ईव्हीएम यंत्रांची प्रथम पुरवणी सरमिसळ

राजकीय पक्ष प्रतिनिधींच्या उपस्थितीत ईव्हीएम यंत्रांची प्रथम पुरवणी सरमिसळ


                    www.thejanshaktinews.in






राजकीय पक्ष प्रतिनिधींच्या उपस्थितीत

ईव्हीएम यंत्रांची प्रथम पुरवणी सरमिसळ

 

            सांगली, दि. 24 (जि. मा. का.) : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 च्या निवडणूक कार्यक्रमानुसार ४४-सांगली लोकसभा मतदारसंघाकरिता दि. 7 मे 2024 रोजी मतदान होणार आहे. या अनुषंगाने निवडणूक आयोगाच्या निर्देशानूसार जिल्ह्यातील ईव्हीएम यंत्रांची प्रथम सरमिसळ (First Randomisation) 5 एप्रिल रोजी करण्यात आली होती. आज ईव्हीएम यंत्रांची प्रथम पुरवणी सरमिसळ जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. राजा दयानिधी व विविध राजकीय पक्षांचे प्रतिनिधी यांच्या उपस्थितीत करण्यात आली.

            यावेळी सहायक जिल्हाधिकारी अमित रंजन, उपजिल्हा निवडणूक अधिकारी निता शिंदे, उपजिल्हाधिकारी तथा ईव्हीएम नोडल अधिकारी डॉ. विकास खरात व जिल्हा सूचना व विज्ञान अधिकारी यासीन पटेल आदी उपस्थित होते.

            यावेळी ईव्हीएम व व्हीव्हीपॅट व्यवस्थापनाचे नोडल अधिकारी डॉ. विकास खरात यांनी सांगली लोकसभा मतदार संघाकरीता उपलब्ध असलेल्या बॅलेट युनिट (BU), कंट्रोल युनिट (CU) व VVPAT च्या अनुषंगाने उपस्थित राजकीय पक्षाच्या प्रतिनिधींना माहिती दिली.

            या सर्व मशिन्सचे विधानसभा मतदारसंघनिहाय Randomisation प्रमाणे वाटप करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी दिली.

♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️
♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️