yuva MAharashtra !! स्वामी विवेकानंद यांचे मौलिक विचार !!

!! स्वामी विवेकानंद यांचे मौलिक विचार !!


!! स्वामी विवेकानंद यांचे मौलिक विचार !!


संकलन : मिलिंद पंडित, कल्याण

• आपण जेवढे जास्त कष्ट करतो, यश तेवढेच उज्वल राहते.

• कोणत्याही प्रकराची भीती आणि अपूर्ण इच्छा सर्व दुःखाचे कारण आहे.

• स्वतःला कमजोर किंवा लहान समजणे हेच सर्वात मोठे पाप आहे.

• ज्या दिवशी कामामध्ये कोणतीही समस्या येणार नाही, त्यादिवशी समजून घ्यावे की आपण चुकीच्या मार्गावर आहोत.

• सुख आणि दुःख हे दोघेही चांगले शिक्षक आहेत, आपल्याला नेहमी ते शिकवत राहतात.

• ज्या गोष्टी शारीरिक, मानसिक आणि अध्यात्मिक रूपात आपल्याला कमजोर बनवतात, त्यांचा लगेच त्याग करावा.

• जेव्हा मनाचे आणि मेंदूचे ऐकण्याची गरज पडेल, तेव्हा सर्वात पहिले मनाचे ऐकावे.

• अनुभव हा सर्वश्रेष्ठ शिक्षक आहे.

• स्वतःसाठी सगळेच जगतात, इतरांसाठी जगणे हेच जीवन आहे.

• उठा, जागे व्हा आणि जो पर्यंत लक्ष्य प्राप्त करत नाही तो पर्यंत थांबु नका.

• स्वतः चा विकास करत रहा. लक्षात ठेवा गती आणि वाढ ही तर जिवंतपणाची लक्षणे आहेत.

• या विश्वातील सर्व शक्ती आपल्याकडे आहेत. परंतु आपण आपल्या डोळ्यावर हात ठेवतो आणि किती अंधार आहे म्हणुन रडत बसतो.

• सरळ मार्गी असणे हेही एक प्रकारचे पापच आहे. कारण, हे पाप कालांतराने मनुष्याला दुर्बळ बनविते.

• कधीही कुणाची निंदा करु नका. जर तुम्हाला त्यांना मदतीचा हात पुढे करायचा असेल तर नक्कीच पुढे करा, नसेल तर हात जोडा. आपल्या भावनांनी त्यांना सदीच्छा द्या व त्यांना त्यांच्या मार्गावरून जाऊ द्या.

• दिवसातून एकदा तरी स्वतःशी बोला, अन्यथा आपण या जगातील एका उत्कृष्ट व्यक्तीशी संवाद हरवून बसाल.

• आयुष्यात जोखीम घ्या. जिंकलात तर नेतृत्व कराल आणि हरलात तर मार्गदर्शन कराल.

• जग ही एक मोठी व्यायामशाळा आहे; जिथे

आपण स्वतःला मजबूत बनविण्यासाठी आलो

आहोत.

• जे कोणी आपल्याला मदत करतात, त्यांना विसरू नका. जे कोणी आपल्यावर प्रेम करतात, त्यांचा द्वेष करू नका आणि जे कोणी आपल्यावर विश्वास ठेवतात त्यांना फसवू नका.

• कधीच स्वतःला कमी समजू नका.

• ज्या गोष्टी तुम्हाला दुर्बल बनवीत आहेत, अशा गोष्टी विष आहेत, असे समजून त्यांचा त्याग करा.

• एका वेळी एकच गोष्ट करा आणि ते करत असताना आपले सर्व लक्ष त्या गोष्टीवरच केंद्रित करा.

• मेंदू आणि हृदय या दोघात संघर्ष चालु असेल, तर नेहमी हृदयाचे ऐका.

• कोणत्याही गोष्टीची मनात भीती बाळगू नका, तरच तुम्ही अद्भुत काम करू शकाल आणि हा निर्भीडपणाच तुम्हाला परम आनंद देईल.

• मनाची शक्ती ही सूर्याच्या किरणांसारखी असते. जेव्हा ती एका केंद्रबिंदूवर केंद्रित होते तेव्हाच ती प्रखरतेने चमकते.

• जर आपले व्यक्तिमत्त्व सुंदर नसेल तर सुंदर दिसण्याला काहीच अर्थ नाही. कारण सुंदर दिसण्यात आणि सुंदर असण्यात खूप फरक असतो.

संदर्भ : इंटरनेट

◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆