yuva MAharashtra दिवसभर बसून काम केल्यानं मणक्याचे दुखणे छळतेय ? पाठ दुखतेय ? तज्ञ सांगतात, आजार गंभीर होण्यापूर्वीच.....

दिवसभर बसून काम केल्यानं मणक्याचे दुखणे छळतेय ? पाठ दुखतेय ? तज्ञ सांगतात, आजार गंभीर होण्यापूर्वीच.....


           www.thejanshaktinews.in






दिवसभर बसून काम केल्यानं मणक्याचे दुखणे छळतेय ? पाठ दुखतेय ? तज्ञ सांगतात, आजार गंभीर होण्यापूर्वीच.....

आपल्यापैकी बहुतांश जणांची कामे ही सध्या बैठ्या स्वरूपाची असतात. विविध सरकारी कार्यालयांमध्ये, बँकेत, आयटीमध्ये काम करणारे कर्मचारी यांसारख्या असंख्य जणांचे काम हे बैठ्या स्वरूपाचे असते. शेतात किंवा कष्टाचे काम करण्यापेक्षा बैठे काम बरे वाटत असले तरी त्यामुळे आरोग्याच्या विविध तक्रारी उद्भवण्याची शक्यता असते. दिवसाचे ८ ते १० तास सलग बसून काम केल्याने पाठ, मणका यांच्या तक्रारी उद्भवतात. यातही विशेषत: लठ्ठ व्यक्ती आणि व्यायाम न करणाऱ्यांना मणक्याचा त्रास जाणवू शकतो. म्हणून व्यायाम करणे आणि बसण्याच्या पद्धतीकडे लक्ष देणे या गोष्टी आवर्जून करायला हव्यात. कारण एकदा मणक्याच्या दुखण्याने डोके वर काढले की आपल्या हालचालींवर तर मर्यादा येतातच पण आरोग्याच्या इतरही समस्या उद्भवतात...

मणक्याचे आजार म्हणजे नेमके काय...?

सतत एकाच स्थितीत बसल्याने पाठदुखी, सांधेदुखी, डिस्क प्रोलॅप्स (सायटिका) अशा समस्या उद्भवतात. यामुळे पायांचे, खांद्याचे, खुब्याचे दुखणे सुरू होण्याचीही शक्यता अशते. डिस्क (मणक्यामधील चकती) सरकल्यास सायटिकाच्या नसांवर दबाव येतो व सायटिकाचे दुखणे वाढते. तसेच मणक्यातील डिस्कमधील पाणी कमी होते. त्यामुळे जी डिस्क धक्का सहन करणाऱ्या स्प्रिंगचे काम करते ती करीत नाही. त्याला डिस्क डिजनरेट होणे असे म्हणतात. त्यामुळे सांध्यांवर ताण येतो आणि पाठदुखी सुरू होते.

मणका आणि पाठीच्या समस्यांची कारणे...

व्यायामाचा अभाव, वाढलेले वजन, पाठीत बाक काढून चालायची आणि बसायची सवय यामुळे मागच्या बाजूच्या सांध्यांवर ताण येतो. अनेकदा टूव्हीलर किंवा चारचाकी चालवताना धक्के बसतात. बरेच दिवस हे दुखणे अंगावर काढले तर ही समस्या वाढत जाते आणि भविष्यता त्याचे विपरीत परीणाम दिसायला लागतात. 

शरीराची पोझिशन ताठ हवी, मानही ताठ असायला हवी. मोबाइलचा अतिवापर केल्याने टेक्स नेक सिंड्राोम होऊ शकतो. त्यामुळे मोबाइलचा अतिवापर टाळायला हवा. दिवसातून किमान वेळ काढून काही ना काही व्यायाम नियमितपणे करायला हवा. दुचाकी किंवा चारचाकी चालविताना स्पीड ब्रेकरमुळे मणक्याला धक्के बसतात त्यामुळे गाडी चालवताना योग्य ती काळजी घ्यायला हवी. 

कोणती काळजी घ्यायला हवी...?

१. बसताना चुकीच्या पद्धतीने बसू नये...
 बरेचदा कामाच्या नादात आपण तिरके, वाकडे बसतो. मात्र त्याने नंतर पाठ अवघडते. 

२. खाली वाकून काही उचलताना...
 वाकून चुकीच्या पद्धतीने जोर लावला तर पाठ दुखते. 

३. लॅपटॉप किंवा टेबल आणि खुर्चीची पोझिशन... योग्य असेल तर ही समस्या उद्भवत नाही. त्यामुळे आपली बसायची पद्धत योग्य आहे की नाही हे तपासावे. 

४. अनेकदा चालताना पाय दुखतात...
बॅक स्ट्रेन झाला असेल, सांध्यांना इजा झाली तर वळताना मान दुखते. खांद्याच्या वरचा भाग दुखतो, मुंग्या येतात. त्यामुळे नियमीतपणे व्यायाम करणे आवश्यक आहे. 

संकलन-

निसर्ग उपचार तज्ञ 
डॉ. प्रमोद ढेरे, पिंपरी-चिंचवड, पुणे. 
आरोग्यविषयक व्याख्याते व लेखक

हेही पहा-----


https://youtu.be/b9QoFL8VwtI?si=G5t3bM9zDf25oOzJ

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖