भिलवडी दि.१५ : माळवाडी ता.पलूस येथे डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडिया च्या वतीने जिल्हा उपाध्यक्ष संदिप काटे यांच्या मार्गदर्शनाखाली भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची १३३ वी जयंती विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी मा.श्री. मानवेकर प्राणी महासंघाचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष मा.श्री दिनकर गस्ते यांच्या हस्ते महामानव भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला. तर डिपीआयचे जमीन झोपडी हक्क अभियान राज्य प्रमुख अशोकराव वायदंडे यांच्या हस्ते लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला.
यावेळी माळवाडी ता.पलूस येथीलस्वप्नील सुधाकर मोरे यांची नाशिक विभागात कृषी सहाय्यकपदी निवड झाले बद्दल डिपीआयचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष सतिश लोंढे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तसेच माळवाडी येथील संजिवनी सह.सोसायटीच्या निवडणुकीत बिनविरोध निवड झालेल्या नवनिर्वाचित सदस्यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी भारतीय संविधान निर्माते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त लिंबू सरबत चे वाटप करण्यात आले.
कार्यक्रमाचे आयोजन डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडिया चे सांगली जिल्हा उपाध्यक्ष संदिप काटे यांनी केले होते.
कार्यक्रमासाठी डीपीआय चे तासगांव तालुका युवक अध्यक्ष अभय सकटे , ग्रामपंचायत माजी सदस्य मनेश मोरे , सुधाकर मोरे , बाळू भोकरे , व्यंकोजी जाधव , अमित संन्दे , धिरज मोरे , अमर दाबाडे , शामराव मोरे , शैलार मोरे , आदित्य गेजगे , आशिष वायदंडे , सतीश सुभाष मोरे , सुनील आवळे , गणेश मस्के , दिलावर मुजावर , राजू सुतार , जवाहर पवार , सुनिल खोत , इत्यादी मान्यवर व कार्यकर्ते उपस्थित होते.
हेही पहा ----
https://youtu.be/RoL-d7g2kX4?si=-YUpdLcIiEu5jzG6
https://youtu.be/pbkAi5NEtlM?si=LrPIksJGEiS5lQ3B
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆
Youtube Link
👇
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆