पलूस : शनिवार दिनांक 6 एप्रिल 2024,प्लॅस्टीक निर्मुलन उपक्रमातंर्गत पलूस शहरातील जिल्हा परिषद शाळा नं.1,2,3 मध्ये सर्वप्रथम सर्व विद्यार्थी व शिक्षकांनी प्लास्टिक निर्मूलनाबाबतची शपथ घेतली तसेच आपल्या शाळा परिसरातील प्लास्टिक संकलन केले .यानंतर पं.वि. दिगंबर हायस्कूल पलुस या विद्यालयासह माध्य.शाळात प्लास्टिक संकलन मोहिम राबविण्यात आली.यात शाळा परिसरातील तसेच शहरातील प्लास्टिक संकलनात विद्यार्थी,शिक्षक यांनी सहभाग घेत आज प्लॅस्टीक निर्मुलन उपक्रमातून सुमारे दहा पोती प्लॅस्टीक कचरा जमा करण्यात आला. पंडित विष्णू दिगंबर हायस्कूल पलुस परिसरात प्लास्टिक संकलन करण्यामध्ये सांगली जिल्हा परिषदेचे प्राथमिक शिक्षणाधिकारी मोहनराव गायकवाड यांनी स्वतः सहभाग घेतला.यावेळी प्लॅस्टीक निर्मुलन घोषवाक्ये बोर्ड घेवून विद्यार्थ्यानी जागरुक नागरिक होवूया. प्लॅस्टीक बंदीला साथ देवूया. प्लॅस्टीक हटाव. पर्यावरण बचाव या घोषणा दिल्या. यावेळी बोलताना शिक्षणाधिकारी मोहनराव गायकवाड म्हणाले की सांगली जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या प्लास्टिक संकलन मोहिमेत सांगलीकरांनी भरभरून प्रतिसाद दिला असून सांगली जिल्ह्यात आठ टन प्लास्टिक गोळा करण्यात आले आहे.याची दखल राज्य व राष्ट्रीय पातळीवर घेण्यात आली ही आपल्या सर्वांना अभिमानाची बाब आहे.दर महिन्याच्या पहिल्या व तिसऱ्या शनिवारी होणाऱ्या या मोहिमेत समाजातल्या सर्व घटकांनी सहभाग घ्यावा.तसेच शाळा महाविद्यालयानी यात सातत्य ठेवावे. प्लास्टिक पासून दूर राहण्यासाठी सर्वांनीच प्रयत्न करावा आणि तो आपल्या दैनंदिन जीवनाचा एक भाग व्हावा की जेणेकरून प्लास्टिक निर्मूलनाची गरज भासणार नाही.
या मोहिमेत केंद्रप्रमुख राम चव्हाण, पंडित विष्णू दिगंबर हायस्कूलचे मुख्याध्यापक तानाजी करांडे, संस्थेचे सचिव जयंतीलाल शहा, संचालक सुनील रावळ,शिक्षक नेते मारुती शिरतोडे, बाळासाहेब खेडकर, उपक्रमशील शिक्षक बाळासाहेब चोपडे, बागल मॅडम,सर्व शिक्षक तसेच जिल्हा परिषद शाळांच्या उपक्रमात शाळा नं.2 च्या वरिष्ठ मुख्याध्यापिका बिना माने,शाळा नं.3 च्या मुख्याध्यापिका वंदना सनगर, नितीन चव्हाण, प्रकाश शिंदे, जगन्नाथ शिंदे, अनिल कणसे, शैलजा लाड, सुनीता पवार, वनिता कांबळे, कविता कांबळे, विशाखा ढेरे, स्मिता लाड, संगिता पाटील सह सर्व शिक्षक, विद्यार्थी उपस्थित होते.
हेही पहा ----
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆