सांगली, दि. 26, (जि. मा. का.) : भारतीय सैन्यदल, नौदल व वायुदलामध्ये अधिकारी पदावर भरती होण्यासाठी पात्र उमेदवारांना Service Selection Board (SSB) या परीक्षेची पूर्व तयारी करून घेण्यासाठी छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्र, नाशिक रोड, नाशिक येथे महाराष्ट्र शासनातर्फे महाराष्ट्रातील नवयुवक व नवयुवतींसाठी दिनांक 20 ते 29 मे 2024 या कालावधीत प्रशिक्षण आयोजित करण्यात आल्याची माहिती जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी ले.कर्नल डॉ. भिमसेन चवदार (निवृत्त) यांनी दिली.
या प्रशिक्षणाकरीता सांगली जिल्ह्यातील इच्छुक उमेदवारांनी सैन्य दलातील अधिकारी पदाची संधी उपभोगण्यासाठी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, सांगली येथे दिनांक 15 मे 2024 रोजी मुलाखतीस उपस्थित रहावे. मुलाखतीकरीता Department of Sainik Welfare, Pune (DSW) यांच्या संकेतस्थळावर नमुद केलेल्या पात्रता निकषानुसार SSB-57 या कोर्ससाठी प्रवेश व परिशिष्टांची प्रिंट सोबत आणावी.
अधिक माहितीसाठी प्रभारी अधिकारी, छात्र प्रशिक्षक केंद्र, नाशिक रोड, नाशिक यांचा ईमेल आय डी -training.pctcnashik@gmail.com व दूरध्वनी क्रमांक 0253-2451032 किंवा व्हाट्सॲप क्र.9156073306 वर संपर्क करावा, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, सांगली यांनी केले आहे.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
Youtube Link
👇
https://youtube.com/@thejanshakatinews5707
Portal Link
👇
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖