yuva MAharashtra उमेदवारांनी वेळेत अर्ज सादर करावा... जिल्हाधिकारी डॉ.राजा दयानिधी

उमेदवारांनी वेळेत अर्ज सादर करावा... जिल्हाधिकारी डॉ.राजा दयानिधी


 

        सांगली, दि. 10, (जि. मा. का.) : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 चा कार्यक्रम घोषित झाला असून दिनांक 12 एप्रिलपासून नामनिर्देशन पत्र दाखल करण्यात येणार आहेत. इच्छुक उमेदवारांनी आपला उमेदवारी अर्ज वेळेत सादर करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी केले.  


        जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात राजकीय पक्षांची बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी निवासी उप जिल्हाधिकारी ज्योती पाटील, उपजिल्हाधिकारी डॉ. स्नेहल कनिचे, सूचना व विज्ञान अधिकारी यासीन पटेल,उ पमुख्य कार्यकारी अधिकारी (साप्रवी ) प्रमोद काळे, मुख्य लेखा परिक्षक (मनपा) शिरीष धनवे, जिल्हा माहिती अधिकारी फारूक बागवान आदी उपस्थित होते.


        ते म्हणाले, लोकसभा निवडणुकीसाठी दि 12 एप्रिल पासून नामनिर्देशन पत्र सुरू होणार असून सकाळी 11 ते दुपारी 3 या वेळेत उमेदवारांनी आपला अर्ज दाखल करावा. अपूर्ण अर्ज सादर करू नये. उमेदवाराच्या खर्चाबाबत प्रशासनाकडून शाडो रजिस्टर ठेवण्यात येणार असून त्याद्वारे त्याची पडताळणी केली जाईल. तसेच उमेदवारांनी खर्चाची नोंदणी काळजीपूर्वक करावी. सुट्टीच्या दिवशी अर्ज स्वीकारण्यास येणार नसल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.


        मतदानादिवशी नियुक्त मतदान प्रतिनिधींनी काय करावे, काय करू नये या अनुषंगाने सविस्तर माहिती डॉ. कनिचे यांनी दिली. शिरीष धनवे यांनी उमेदवाराच्या खर्च विषयक तसेच निवासी उपजिल्हाधिकारी तथा आचारसंहिता कक्षाच्या नोडल अधिकारी ज्योती पाटील यांनी आचारसंहिता भंगाबाबत तर जिल्हा माहिती अधिकारी फारुख बागवान यांनी जाहिरात प्रमाणिकरण व पेड न्यूजच्या अनुषंगाने यावेळी उपस्थित राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींना सविस्तर माहिती दिली. या बैठकीसाठी विविध राजकीय पक्षाचे प्रतिनिधी उपस्थित होते.

हेही पहा -----

◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆