सांगली दि. 20 (जि.मा.का.) : सहकार व लेखा पदविका मंडळाकडून (जी.डी.सी. ॲण्ड ए बोर्ड) घेण्यात येणारी शासकीय सहकार व लेखा पदविका (जी.डी.सी. ॲण्ड ए) परीक्षा व सहकारी गृहनिर्माण व्यवस्थापन (सी.एच.एम.) परीक्षा दिनांक 24, 25 व 26 मे 2024 रोजी सकाळी 10 ते दुपारी 1 व दुपारी 2 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत घेण्यात येणार आहे.
ही परीक्षा हि.हा.रा. चिंतामणराव पटवर्धन हायस्कूल, सांगली गणेशदुर्ग, राजवाडा चौक सांगली व कै.ग.रा.पुरोहित कन्या प्रशाला सांगली, गणेशदुर्ग राजवाडा, सांगली या दोन केंद्रावर होणार आहे. परीक्षार्थींना त्यांची प्रवेशपत्रे जी.डी.सी. ॲण्ड ए बोर्डाकडून ऑनलाईन पाठविण्यात आली आहेत. परीक्षार्थींनी संबंधित परीक्षा केंद्रावर वेळेत उपस्थित रहावे, असे आवाहन जिल्हा उपनिबंधक उर्मिला राजमाने यांनी केले आहे.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖