भिलवडी ता.१3 : विश्व अध्यात्म गुरु परमपूज्य श्रीश्री रविशंकरजी यांच्या जन्मदिनी आर्ट लिव्हिंग शाखा भिलवडी ता. पलूस यांच्या वतीने अखंडित 20 व्या वर्षी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले.
डॉ. श्रीकांत चव्हाण, डॉ. महेश पाटील, प्राध्यापक यादव सर, श्री राजेंद्र कांबळे यांच्या हस्ते दिपप्रज्वलन करून श्री श्री रविशंकरजी यांच्या प्रतिमेचे पूजन करून शिबिरास प्रारंभ केला.
ऐन उन्हाळ्यामध्ये सर्वत्र रक्ताचा तुटवडा भासत असतो त्यामुळे आर्ट ऑफ लिविंग च्या माध्यमातून गेली वीस वर्ष या रक्तदान शिबिराचे आयोजन केले जाते. भिलवडी,माळवाडी , अंकलखोप परिसरातील 50 दात्यानी या शिबिरामध्ये रक्तदान केले. हा उपक्रम गेली 20 वर्षे अखंडितपणे आर्ट ऑफ लिविंग मार्फत सुरू असल्याने नियमित रक्तदाते न चुकता या दिवशी आवर्जून रक्तदान करतात .
या शिबिराचे आयोजन दक्षिण भाग सोसायटी तळमजला या ठिकाणी केले होते.
यावेळी श्री शशिकांत भागवत,भिलवडी व्यापारी संघटना व जायन्ट्सचे अध्यक्ष सुबोध वाळवेकर, अंकलखोपचे लोकनियुक्त सरपंच सौ राजेश्वरी सावंत, उद्योजक श्री. गिरीश चितळे, श्री संदीप कोळी,श्री महादेव महिंद, श्रीकांत जोशी,राजू कोरे,संदिप कोळी , शरद जाधव सर, सुरेश शेणोले , शुभम भागवत, संतोष वाळवेकर, राजेंद्र पाटील, सौ निलांबरी पाटील, सतीश आबा पाटील, दत्ता उतळे आदी मान्यवर उपस्थित होते . आदर्श ब्लड बँक सांगलीचे संजय टकले यांनी रक्त संकलन केले.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖