yuva MAharashtra गूड न्यूज : राज्यात मान्सून लवकरच हजेरी लावणार ; मान्सूनच्या आगमनाची तारीख ठरली, या दिवशी केरळात होणार दाखल.. उकाड्यापासून मिळणार दिलासा...

गूड न्यूज : राज्यात मान्सून लवकरच हजेरी लावणार ; मान्सूनच्या आगमनाची तारीख ठरली, या दिवशी केरळात होणार दाखल.. उकाड्यापासून मिळणार दिलासा...




द जनशक्ती न्यूज नेटवर्क :  16 MAY 2024

शेतकरी आणि सर्वसामान्याच्या दृष्टीने हवामानाविषयी एक महत्त्वाची अपडेट आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, यंदा मान्सूनचे वेळेआधी आगमन होणार आहे. त्यामुळे पावसाची आतुरतेने वाट पाहणाऱ्या शेतऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. सध्या राज्यात उष्णतेची लाट सुरू आहे. त्यामुळे या असहाय्य उन्हापासून सुटका व्हावी म्हणून प्रत्येत जण मान्सूनची वाट पाहत आहे.
 यंदा मे अखेरीस म्हणजे 31 मे किंवा 1 जून 2024 रोजी नैऋत्य मान्सून केरळात दाखल होणार आहे. भारतीय हवामान खात्याने याबाबत अंदाज वर्तवला आहे.

केरळात सामान्यताः 1 जून रोजी मान्सून दाखल होतो. यात काही वेळा काही दिवस मागेपूढे होत संपूर्ण देशात साधारण 15 जुलैपर्यंत मान्सून सक्रीय होतो. गेल्या वर्षी मान्सून 8 जून रोजी केरळमध्ये दाखल झाला होता. यंदा 19 मे रोजी दक्षिण अंदमानच्या समुद्रात मान्सून दाखल होण्याची शक्यता आहे. त्यानुसार, 1 जून रोजी केरळात दाखल होऊ शकतो. त्यानुसार, गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा मान्सून लवकर केरळमध्ये दाखल होण्याची शक्यता आहे.

हवामान विभागानुसार, देशात ला निनाची स्थिती सक्रिय होत आहे, तर एल निनोचा प्रभाव कमकुवत होत आहे. यामुळे यंदा चांगल्या पावसाची शक्यता आहे. वातावरणातील हे स्थिती मान्सूनसाठी अनुकूल आहे. यंदा मान्सून वेळेआधीच भारतात येऊ शकतो. तसेच ला नीना सोबतच, हिंद महासागरातील हवेच्या दाबाची परिस्थिती ही देखील मान्सूनसाठी अनुकूल होत आहे.

महाराष्ट्रात मान्सून कधी ?

नैऋत्य मान्सून 19 मे पर्यंत अंदमान आणि निकोबार बेटांवर दाखल झाल्यानंतर साधारण 1 जूनपर्यंत मान्सून केरळच्या किनारपट्टीवर धडकेल. बंगालच्या उपसागरातून भारताकडे मान्सून सरकण्यासाठी परिस्थिती अनुकूल आहे, त्यामुळे 19 मेपर्यंत मान्सून भारतीय हद्दीत दाखल होईल, असा अंदाज आहे.

त्यानुसार, केरळनंतर महाराष्ट्रातही वेळेआधीच मान्सून दाखल होईल. त्यानुसार, महाराष्ट्रात 11 जून रोजी मान्सून दाखल होऊ शकतो, असा अंदाज आहे. तर दिल्लीत 30 जूनपासून मान्सूनचे आगमनाला सुरूवात होऊ शकते.

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖