yuva MAharashtra पलूस तालुका संघर्ष दिव्यांग सामाजिक संघटनेची मासिक सभा खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न..

पलूस तालुका संघर्ष दिव्यांग सामाजिक संघटनेची मासिक सभा खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न..



                             व्हिडिओ पहा
                         👇




पलूस दि. १९ : पलूस तालुक्यातील संघर्ष दिव्यांग सामाजिक संघटनेची मासिक सभा आज रविवार दि.१९ मे रोजी हुतात्मा स्मारक पलूस येथे खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली.

   आजची मासिक सभा हि अपंग बांधवाच्या दृष्टीने अत्यंत महत्वाची ठरली.



 अपंग बांधवांना मार्गदर्शन करण्यासाठी  राजकीय व सामाजिक क्षेत्रातील विविध मान्यवरांना या सभेसाठी आमंत्रित करण्यात आले होते.

 पलूस तालूका संघर्ष दिव्यांग सामाजिक संघटनेच्या वतीने या मासिक सभेचे आयोजन करण्यात आले होते.


 दिव्यांग बांधवांना मार्गदर्शन करण्यासाठी उपस्थित असलेले प्रमुख मार्गदर्शक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी  (अजित पवार गट) प्रतिनिधी श्री.प्रदीप कदम , पलूस-कडेगाव प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेचे संयोजक श्री.महेश सुतार , ज्येष्ठ मार्गदर्शक बाळकृष्ण पवार आप्पा,  यांच्यासह संघर्ष दिव्यांग संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुनील दाशाळ, उपाध्यक्ष संतोष सावंत, पलूस दिव्यांग संघटनेच्या महिला अध्यक्ष अश्विनी कुंभार, स्वाती पोळ मॅडम, स्वामी विवेकानंद दिव्यांग फाउंडेशनचे अध्यक्ष दत्तात्रेय पाटील,उपाध्यक्ष मधुकर कुंभार, संस्थेचे खजिनदार सर्जेराव शिंदे, कृष्णाकाठ दिव्यांग संस्थेचे अध्यक्ष श्री राजेंद्र खोडवे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चे पदाधिकारी श्री. हनुमंतराव देशमुख श्री.नंदकुमार निकम,श्री.निवास कदम,श्री.अभिजित सावंत यांच्यासह मोठ्या संख्येने दिव्यांग बांधव उपस्थित होते.


 राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) कडून  गेल्या अनेक दिवसांपासून दिव्यांग दिव्यांग बांधवांचे प्रश्न मार्गी लावण्याचे काम सातत्याने सुरु आहे. यापुढे पलूस तालुक्यातील दिव्यांग व्यक्तींनी अडीअडचणी संदर्भात आमच्याशी संपर्क साधल्यास उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या माध्यमातून समस्या सोडवण्याचा पुरेपूर प्रयत्न केला जाईल, तसेच रुग्णांना आणि गरजवंतांना शस्त्रक्रियेसाठी सहकार्य केले जाईल, असे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी  (अजित पवारगट) प्रतिनिधी श्री.प्रदीप कदम यांनी यावेळी बोलताना सांगितले.


   इतर मान्यवरांनी देखील दिव्यांग बांधवांच्या सर्व शासकीय योजनांची माहिती देऊन दिव्यांग बांधवांना शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन दिले. 
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖